कोकण

शिवसेनेतून भाजपमध्ये 'इन्कमिंग'; मोठ्या नेत्याचा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सिध्दिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर आणि 'स्वाभिमानी'च्या मनिषा नलावडे-पाटील यांनी आज (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश केला. मयेकर यांनी 2014 मध्ये विधानसभा शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

जामसांडे देवगड येथील भाजप बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात भाजप नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी भाजपचे संघटन मंत्री सतिश धोंड, माजी आमदार अजित गोगटे, संदेश पारकर, अतुल रावराणे उपस्थित होते.

आशिष शेलार आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असून, कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघात बुथ प्रमुखांचे मेळावे घेऊन कार्यकर्त्याशी त्यांनी संवाद साधला. 

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उमेदवार आहेत, असे समजून कामाला लागा, असे आवाहन शेलार यांनी करताच कणकवली, देवगडच्या भाजपच्या बुथप्रमुखांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच भाजप हा पक्ष 'मी'चा विचार करणारा नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT