success story farmer  Shailesh Bhasme sadvli ratnagiri
success story farmer Shailesh Bhasme sadvli ratnagiri 
कोकण

कोकणात कलिंगड व पपई पिकानंतर यंदा स्ट्रॉबेरीकडे वळत युवा शेतकरी शैलेश करतोय नवनविन प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी) : केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार साडवली येथील युवा शेतकरी शैलेश भस्मे यांनी गेली तीन वर्षे शेतजमीन भाडेकराराने घेऊन यशस्वी प्रयोग केले आहेत. यंदा याच दोन एकर जागेत भस्मे यांनी स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.


थंड हवेच्या ठिकाणी होणारे स्ट्रॉबेरीचे पीक आता साडवलीतही तयार होणार आहे. यासाठी जिद्द व मेहनत सोबत घेवून भस्मे यांनी ही लागवड केली आहे. गेली दोन ते तीन वर्ष ते या जागेत विविध पिके घेत आहेत. प्रथम त्यांनी पपईचे चांगले पीक घेतले. त्याचे स्वतः मार्केटींग केले. यामुळे चार पैसे अधिक मिळाले असे भस्मे सांगतात. एकदा ७० टन कलिंगडाचे पीक घेवून चांगला नफा मिळवला. ही पिके घेत असतानाच आंतरपीक म्हणून ते काकडी, मिरचीचे उत्पादन करतात. पडीक व ओसाड जमीन घेवून शैलेश भस्मे या युवा शेतकऱ्याने मेहनत व योग्य नियोजन करुन शेती प्रयोग केले तर ते यशस्वी होतात हे दाखवून दिले आहे.

कलिंगड व पपई पिकानंतर यंदा स्ट्रॉबेरीकडे वळलो आहे. या पिकाची संपूर्ण माहिती, फवारणीची पद्धत अभ्यासली. दोन एकरमध्ये आपण ३० हजार प्लॅंट लावले असून, मला २० ते २५ टन स्ट्रॉबेरी मिळेल, असा विश्वास आहे. 
- शैलेश भस्मे


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT