Suresh Prabhu Visit Agriculture Minister For Nursery Professionals
Suresh Prabhu Visit Agriculture Minister For Nursery Professionals  
कोकण

नर्सरी व्यावसायिकांसाठी सुरेश प्रभु धावले कृषीमंत्र्यांकडे

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - लॉकडाऊनचा फटका नर्सरी व्यवसायालाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे वाहतुकीसाठी परवानगी नसल्याने अनेक रोपे नर्सरीमध्ये पडून राहिल्याने लाखो रुपयांचा नर्सरी व्यवसाय ठप्प झाला आहे. माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी नर्सरी व्यवसायिकांचा रोजीरोटीचा हा प्रश्‍न केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यापुढे मांडला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नर्सरी व्यवसायिकांचा वाहतुकीचा आणि रोप विक्रीचा प्रश्‍न सुटणार, असा विश्‍वास भाजपचे युवा नेते संतोष गांगण यांनी व्यक्त केला. 

दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असलेला नर्सरी व्यवसाय अद्यापही ठप्प आहे. अटी आणि शर्थी घालून शासनाने लॉकडाऊनमध्येही व्यवसायाला सुरवात करण्यास परवानगी दिली नाही. पावसाळ्याच्या आरंभाला झाडांची शेतकऱ्यांसाठी लागवड केली जाते. या लागवडीसाठी लागणारी रोपांची नर्सरीमध्ये रुजवात केली जाते. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूकही करावी लागते. त्यासाठी बॅंकांकडून कर्जही घेऊन हा व्यवसाय केला जातो. यावर्षीही अनेक नर्सरी व्यवसायिकांनी नर्सरींमध्ये रोपांची रुजवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस पडून रोपांच्या लागवडीला सुरुवात होणार आहे.

वाहतुकीला परवानगी न मिळाल्यास नर्सरी व्यवसायिकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. एवढेच नव्हे तर, बॅंक कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे, हा प्रश्‍न भविष्यात त्यांना सतावणार आहे. हा प्रश्‍न माजी केंद्रीयमंत्री प्रभू यांनी केंद्री कृषीमंत्री तोमर यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे मांडला. त्यांच्याशी चर्चाही केली, अशी माहिती संतोष गांगण यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT