mokhada.jpg
mokhada.jpg 
कोकण

जव्हारमधील शिक्षक 'भारत साहित्यरत्न' पुरस्काराने सन्मानित

सकाळवृत्तसेवा

मोखाडा : जव्हारसारख्या आदिवासी भागातून पदवीधर शिक्षकाचे काम करता करता कविता करण्याच्या आपल्या छंदामुळे मधुकर कावजी भोये हे एक समग्र कवी, गीतकार म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 26 नोव्हेंबर 2018 ला आंध्र भवन, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सामाजिक न्याय महासम्मेंलनात मधुकर भोये यांना 'भारत साहित्य रत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात भारताच्या संविधान दिनानिमित्त अनेक कविता सादर करण्यात आल्या. मधुकर भोये यांनी संविधान दिनावर लिहलेली एक कविता सोशल मीडियावर लॉंच केली. 'ए वतन है शेरो की गुंफां' ही हिंदीतील कविता सांगून उपस्थतांची मने जिंकली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सफाई कामगार आयोगीचे अध्यक्ष मनोहर जाला, सेन्सॉर बोर्डचे सदस्य राजीव मेनन, असिस्टंट कमिशनर आलोक द्रोलिया, डॉ.के.लिंगा राजू यांची विशेष उपस्थिती लाभली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन व  नॅशनल युथ अवॉर्ड फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पुरस्कार बहाल करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धिस्ट सोशल वेलफेअर सोसायटी, एसटी वेलफेअर सोसायटी असोसिएशन,वर्ल्ड सेव्हन वंडर पब्लिकेशन यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT