कोकण

सोनवडे पुलाचे काम एप्रिलपर्यत पूर्ण करा

CD

swt134.jpg
75258
मालवणः वराड सोनवडे पुल प्रश्नी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना माजी खासदार निलेश राणे व ग्रामस्थ.

सोनवडे पुलाचे काम एप्रिलपर्यत पूर्ण करा
माजी खासदार निलेश राणेः ग्रामस्थ, अधिकारींच्या बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ः तालुक्यातील कर्ली नदीपत्रावर वराड सोनवडे दरम्यान उभारण्यात येत असलेले पुलाचे काम रखडले आहे. मात्र, यापुढे कोणताही हलगर्जीपणा न करता योग्य पद्धतीने काम करत ३० एप्रिलपर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार दर आठवड्याला झालेल्या कामाची माहिती देत एप्रिल अखेर काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
एप्रिल अखेर पुलाचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने ग्रामस्थांनी नदीपात्रात जाहीर केलेले उपोषण मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. हे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करा. दोन्ही गावातील जनतेचे स्वप्न असलेले हे पूल लवकर पूर्ण झाले पाहिजे, असे श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. श्री. राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुलाचे रखडलेले काम गेल्या काही दिवसांपासून गतिमान सुरू आहे.
पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी राणे यांनी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत अधिकारी वर्गाची बैठक काल (ता.११) वराड येथे घेतली. त्यावेळी काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना राणे यांनी केल्या. यावेळी अभियंता श्री. माळगांवकर, मक्तेदार व इतर जबाबदार प्रतिनिधी उपस्थित होते.
वराड सोनवडे नदी पुल पुर्ण करण्यासाठीची अंतिम तारीख सर्वांसमक्ष विचारून घेण्यात आली. पुला संदर्भातील सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करण्याची कबुली मक्तेदार आणि अभियंता यांनी दिली. या कामासाठी आवश्यक प्रमाणात निधी आहे, असेही सांगण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, वराड सरपंच, सोनवडे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT