कोकण

बांद्यातील पाणी साठवण टाकीला तडे

CD

76793
बांदा ः बळवंतनगर येथील धोकादायक पाणी साठवण टाकी.

बांद्यातील पाणी साठवण टाकीला तडे

राजाराम सावंत ः ठिकठिकाणी गळती, स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः शहरातील बळवंतनगर येथे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाणीसाठवण टाकीला ठिकठिकाणी तडे गेले असून पाणी गळती होत असल्याने ही टाकी धोकादायक बनली आहे. या टाकीचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात येथील स्वयम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, टाकी धोकादायक असल्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे; मात्र याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ही टाकी जीर्ण झाल्याने दुरुस्ती न करता टाकी बदलणे हाच पर्याय आहे. भविष्यात टाकी कोसळून कोणतीही हानी झाल्यास याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील. टाकीची पाणी साठवण क्षमता मोठी असल्याने टाकी कोसळून दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. यासाठी लवकरात लवकरच योग्य तो निर्णय घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
..............
कोट
टीपः swt१९१९.jpg मध्ये फोटो आहे.
पाणी साठवण टाकी जुनी असल्याने तडे गेल्याने ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ती निर्लेखित करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन कार्यवाही करावी.
- राजाराम सावंत, ग्रामपंचायत सदस्य, बांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT