कोकण

कुणकेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

CD

79957
कुणकेश्वर : येथे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत यात्रा नियोजन सभा झाली.

कुणकेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

वैशाली राजमाने ः प्रशासकीय कामकाजाचा घेतला आढावा

देवगड, ता. २ : श्री क्षेत्र कुणकेश्वर (ता.देवगड) येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे केले. यात्रेच्या निमित्ताने प्रशासकीय कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली असून उर्वरित कामे यात्रेपूर्वी परिपूर्ण केली जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त येत्या १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान यात्रा भरणार आहे. या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर येथे आज यात्रा नियोजन सभेचे आयोजन केले होते. यावेळी राजमाने यांनी विभागवार प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार स्वाती देसाई, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे आदी उपस्थित होते. यात्रेत आरोग्य विभाग, वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची राहिलेली कामे यांची माहिती घेण्यात आली. यावेळी विभागवार काम़ांची माहिती घेण्यात आली. यात्रेत येणाऱ्या भाविकांना कोणत्याही स्वरुपाचा त्रास होऊ नये, यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने सर्व प्रशासकीय पातळीवर काळजीपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
--
सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी
स्थानिक सुरक्षा यंत्रणा, दर्शन व्यवस्था, पाणी शुद्धीकरण व्यवस्थापन, बांधकाम, स्वच्छता आणि वीजेसंदर्भातील कामांची माहिती जाणून घेण्यात आली. अग्निशामक बंब, दुकानाबाबत सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी राहिलेली कामे वेळीच मार्गी लावण्याची सूचना करण्यात आली. प्रशासनाने मंदिर परिसराची पाहणी करून यात्रा नियोजनाचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT