कोकण

जिल्हा परिषदेमुळेच ग्रामीण विकास

CD

81067
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा शुभारंभ करताना प्रजित नायर. शेजारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी.


जिल्हा परिषदेमुळेच ग्रामीण विकास

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर ः स्नेहसंमेलनाचे उद्‍घाटन, ‘टिम वर्क’बाबत कर्मचाऱ्यांना धडे

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ७ ः क्रीडा स्पर्धांमध्ये चांगला सहभाग दिसला. जिल्हा परिषद हा ग्रामीण विकासाचा महत्वाचा भाग आहे. कार्यालयात बसून नियमित काम होते; परंतु स्नेहसंमेलना सारख्या कार्यक्रमाने टीम वर्क निर्माण होते. या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद लुटा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हा परिषद स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, वेंगुर्ले गटविकास अधिकारी मोहन भोई, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रभारी जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, प्रभारी अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदेकर, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी बेहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी यावेळी उपस्थित होते. नायर यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पराडकर यांच्याहस्ते उपस्थितांचा शाल व वृक्ष टॉप देवून सन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन शामसुंदर सावंत, राजेश कदम यांनी केले.
प्रास्ताविक करताना पराडकर यांनी, क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर स्नेहसंमेलन घेत आहोत. प्रत्येकाच्या कला गुणांना वाव मिळावा. गुण समजावे. त्यांच्यातील कला समजावी, यासाठी हे कार्यक्रम घेत आहोत. नियमित काम करताना मानसिक त्रास वाढतो. खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांनी टीम वर्क वाढते. त्यासाठी हा प्रयत्न असून असेच टीम वर्क नियमित कामकाजात यावा यासाठी हा प्रयत्न आहे, असे सांगितले.
--
कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांनी, चांगल्या प्रकारची क्रीडा स्पर्धा झाली. आजच्या कार्यक्रमाने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सळसळता उत्साह वाहत आहे. सुदैवाने आपल्याला सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय घेणारे सीईओ मिळाले आहेत. त्यामुळे आपण असे कार्यक्रम साजरे करीत आहोत. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होत आहे. यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांनी कार्यक्रम सादर करताना वेळेचे बंधन पाळायचे आहे. परवानगी दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यक्रम सादर करायचे आहेत, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT