कोकण

खेड ः आवाशीत खड्ड्यात रासायनिक सांडपाण्याचा साठा

CD

rat8p30.jpg ः
81389
खेडः आवाशी येथे खड्डा खोदून साठवण करण्यात आलेला गाळ.
----------
आवाशीत खड्ड्यात रासायनिक सांडपाणी साठा
हवेसह भूजलाचे प्रदूषण ; प्रदूषण नियंत्रण महामंडळाची नोटीस
खेड, ता. ८ः लोटे एमआयडीसीच्या लोटे परशुराम इन्व्होर्मेन्ट प्रोटेक्शन को-ऑप सोसायटीला प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सोसायटीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सामूहिक सांडपाणी प्रकल्पाकडून कसल्याही प्रकारची परवानगी न घेता तसेच जमिनीमध्ये सध्या खड्ड्यात रासायनिक गाळ साठवण्यात आला आहे. तसेच हवा व भूजल प्रदूषणाच्या शक्यतेमुळे कारणे दाखवा नोटीस बजावली. या संदर्भात आवाशी ग्रामपंचायतीचे सरपंच राज आंब्रे यांनी ही बाब ग्रामस्थांसोबत प्रशासनाच्या निदर्शनास आणली होती तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी तक्रारदेखील केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे.
लोटे एमआयडीसीमध्ये आवाशी गावच्या हद्दीत असणाऱ्या एमआयडीसीच्या जागेत लोटे परशुराम इन्व्होर्मेन्ट प्रोटेक्शन को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सीईटीपी म्हणजेच सामूहिक सांडपाणी प्रकल्पाकडून मोठमोठे खड्डे खोदून त्यात रासायनिक गाळ साठवला गेला. त्याच्या वासाने परिसरातले नागरिक हैराण झाले होते. त्यांनी आवाशी ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी केल्या. त्यानंतर आवाशी ग्रामपंचायतीचे सरपंच राज आंब्रे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा सगळ्या प्रकारच्या परवानग्या असल्याचे सांगण्यात आले; मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी पाहणी करून लोटे परशुराम इन्व्होर्मेन्ट प्रोटेक्शन को - ऑप. सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गाळ साठवल्याचे नमूद करण्यात आले. तसेच या प्रकारामुळे वायू प्रदूषण होत आहे; मात्र भूजल खराब होण्याची भीती देखील व्यक्त केली गेली आहे. आता सामूहिक सांडपाणी प्रकल्पावर व हा निर्णय घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT