कोकण

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

CD

रत्नागिरी, ता. ११ ः पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीसाठी मालगुडी डेज आणि कृष्णकथा या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला.
आर. के. नारायण यांच्या मालगुडी डेज या कथासंग्रहातील शालेय आणि बालजीवनातील कथांवर आधारित संकल्पनेवर विद्यालयातील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेचे पैलू शिक्षकांच्या मदतीने उलगडून दाखवले. दुसऱ्या दिवशी कृष्णकथा या संकल्पनेवर आधारित पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक सादरीकरण केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे- खंडागळे, लष्करी अधिकारी श्रीनिवास गडम आणि प्रशालेचे जनरल मॅनेजर रिटायर्ड कर्नल एस. पी. कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे-खंडागळे आणि कराड शाखेचे मुख्याध्यापक अन्वय चिकटे, सातारा शाखेचे मुख्याध्यापक ए. के. सिंग आणि कणकवली शाखेच्या मुख्याध्यापिका स्वाती कणसे उपस्थित होते. मुख्याध्यापक राकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा झाला.
--
विद्यार्थ्यांचा गौरव
स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या उत्तम वागणुकीचा आपल्या अभ्यासात, कलेत दाखवलेल्या नैपुण्याचा सत्कार करण्यात आला. चतुरस्त्र विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट्स ऑफ दी इयर हा पुरस्कार हर्ष पाटील (दहावी), उत्तम चित्रकारितेसाठीचा आर्टिस्ट ऑफ दी इयर हा पुरस्कार कृष्णा कुलकर्णी (दहावी), उत्कृष्ट खेळासाठी स्पोर्ट पर्सन ऑफ दी इयर पियुष गिम्हवणेकर (दहावी), बेस्ट क्लास ऑफ दी इयरसाठी (इ. १ली) नोंडिला, उत्कृष्ट हाऊससाठी हाऊस ऑफ दी इयर एक्का हाऊसला तर स्टाफ ऑफ दी इयर निगार माजगावकर व मंदिरा सोमवंशी यांना बहाल करण्यात आला. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT