कोकण

सं. डबल लाईफ संगीत नाटकांच्या अधोगतीचे सादरीकरण

CD

rat१३१६. txt

(टुडे पान २ साठी, अॅंकर)

सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो

फोटो ओळी
-rat१३p१३.jpg-
८२४११
ओळी ः बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई या संस्थेने सादर केलेल्या संगीत डबल लाईफ या नाटकातील एक क्षण (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
डबल लाईफ संगीत नाटकांच्या अधोगतीचे सादरीकरण

जुनी व आधुनिक संस्कृतीत पिझ्झा बर्गरचा उहापोह ः बृहन्मुंबई महानगरपालिकाचा कुलवृत्तांत शोध फसला

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः शासनाच्या हौशी संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी येथील केंद्रावर सुरू आहे. मात्र दररोज संगीत रसिकांना मिळणारा आनंद रविवारी झालेल्या सं. डबल लाईफ या नाटकाने रोडावला. बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग केला. रवींद्र भगवते लिखित या नाटकातून जुनी परंपरा आणि आधुनिक संस्कृतीचा मेळ साध्य करताना देवता आणि लोकमान्यांवर दृष्टीक्षेप टाकला. नरवर गज्या समान, डोक्यावरी नसती केस वपन करितो, येते मी आता सासूबाई, नाही मी बोलत नाथा, हा नाद सोडूनिया, अशा नाट्यपदांनी संगीत तज्ज्ञ रसिकांचा अंत पाहिला. लय, ताल सूराची जाण नसल्याचे पाहायला मिळाले. नाटकात अभिनय, विनोद, नेपथ्य, रंगभूषा या गोष्टींना दाद मिळाली. नाटकाचा विषय चांगला होता पण मांडणी, नाट्यपदांची सुस्वर जोड मिळणे अपेक्षित होते. आधुनिकता दाखवताना संगीत नाटकांच्या अधोगतीचे सादरीकरण रसिकांना पाहायला मिळाले.
-------
काय आहे नाटक?
आयुर्वेदाचार्य मंगवेढेकर यांच्या घराण्याची कथा सूत्रधार कथन करतो. मंगळवेढेकर आणि त्यांच्या मुलगा गजानन. बाप-वडील आईच्या सांगण्याने वागत असतात. आई पार्वती हिला तिच्या सासूने सांगितलेले असते की, तू आधुनिकतेचा उपयोग केलास तर तुझ्या पतीला मृत्यू येईल. या भितीने आई अगदी स्वच्छ मराठी बोलण्यावरही कटाक्ष करते. मात्र हे दोघेजण डबल लाईफ जगत असतात. बाहेर इंग्लिश बोलतात. पण घरात आल्यावर जुन्या संस्कृतीप्रमाणे शेंडी व धोतर वापरतात. त्यानंतर गजाननचे लग्न ठरवायचे असते. त्याआधी त्याच्या आईला सासूने सांगितलेले असते की, गजाचे ज्या मुलीशी लग्न होणार आहे. ती तुला राममंदिरात भेटेल. आई मंदिरात जाते त्यावेळी दोन मुली दिसतात. रिद्धी आणि सिद्धी दोघीही गजाननबरोबर लग्न करण्यास तयार असतात. त्या घरी येतात. पण गजा एकीशीच लग्न करणार असतो. त्यामुळे दोघींमध्ये फुगडी, गायन स्पर्धा घेतात. त्यानंतर पाककृती स्पर्धेत बर्वे खानावळीतून एक होणारी सून पिझ्झा-बर्गर आणि दुसरी अमेरीकन डिश घालते. पण कुणी लग्न करायचे निर्णय काही लागत नाही. पुन्हा सासू फोटोतून बाहेर येऊन पार्वतीला सांगते की, तुझं वागणे ठिक नाही. या दोघींचा निर्णय होण्यासाठी मंगळवेढेकर कुलवृतांत-२ हे पुस्तक शोध. सासू काहीतरी शोध घेतेय हे गजानन, रिद्धी-सिद्धी व बाबा यांच्या लक्षात आल्यावर सार घर धुंडाळतात. त्यामध्ये रिद्धीला ते पुस्तक मिळते. ती चक्क सासूवर हिप्नॉटीझमचा प्रयोग करते व तिला घेऊन अॅसलवर्ल्डला घेऊन जाते. तिथे ती पाण्यात डुंबते नाचते, गाते आणि सर्वजण घरी आल्यावर तिच्यावर केलेला प्रयोग काढून घेते. त्यावेळी त्यांच्या सगळ्यांची वेशभूषा आधुनिक असते. ती सासूला सांगते की तुझ्या मनाचे खेळ होते. सासूने असं काही सांगितलेले नाही. अशी नाटकाची कथा होती. पण ती मांडण्यात संस्था अपयशी ठरली.
-------
* पात्र परिचय
बाबा ः संजीव बर्वे, गजानन ः अजित देशमुख, पार्वती ः प्रज्ञा देसाई, सिद्धी ः परिणिता कोरे, रिद्धी ः कोमल आंगणे, पंगतवाढेकर ः विकास तांबे, सुत्रधार ः मनोहर गोसावी. सासू ः मृदुला अय्यर. इतर ः कृष्णा जाधव, सचिन जाधव, लक्ष्मण कदम, भाग्यश्री सानप, मंजुळा सुरवासे, रंगमंच व्यवस्थापन ः निकीता गायकवाड, संदेश जाधव, राम दौड, राहूल झाल्टे.
------
* सूत्रधार आणि साह्य
दिग्दर्शक ः मंचल दर्णे, निर्माता ः प्रमुख कामगार अधिकारी-सुनिल जांगळे सुत्रधार ः विभागीय कामगार अधिकारी- प्रवीण नगराळे, संगीत ः उदय देसाई. संगीत संयोजन ः वैशंपायन, प्रकाश योजना ः श्याम चव्हाण, नेपथ्य ः रजनीश कोंडवीलकर, पार्श्वसंगीत ः अक्षय जाधव. रंगभूषा ः उदयराज तांगडी, वेशभूषा ः सुनिल जाधव. नृत्यदिग्दर्शक ः मंगेश आणि मंगेश. ऑर्गन ः हर्षद रानडे, तबला ः मिलिंद वाणी, अॅक्टोपॅड ः किशोर जाधव, साईड रिदम ः ऋषीकेश जाधव, सिंथेसायझर नेपथ्य निर्माण ः उल्हास सुर्वे आणि मंडळी.
---------
आजचे नाटक
नाटक ः संगीत माऊली. सादरकर्ते ः अमृत नाट्य भारती, मुंबई. स्थळ ः स्वातंत्र्यवीर, वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT