कोकण

-निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

CD

rat१४४०.txt

(पान २ साठी)

‘त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

आमदार कदमांचे आदेश ; आगरवायंगणी रस्ता कामावरून संताप

दाभोळ, ता. १४ ः दापोली तालुक्यातील वारेबुवा (मळे) ते आगरवायंगणी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यानाही धूप घालत नाही तर आमदार योगेश कदम यांना मी बोललो आहे, असे सांगत असल्याने नागरिकांनी समजायचे काय? असा प्रश्न उसगाव येथील सुमेध वैद्य यांनी आमसभेत विचारला. त्यामुळे आमदार योगेश कदम संतापले व त्यांनी या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता पटेल यांना दिले.
दापोली तालुक्यातील वारेबुवा (मळे) ते आगरवायंगणी रस्ताचे काम निकृष्ट झाले असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यावर ठेकेदाराला व्यवस्थित काम करण्याच्या सूचना देऊनही ठेकेदार अभियंत्यांचे ऐकत नाही, माझ्याकडे खूप कामे आहेत असे सांगतो, असे वैद्य यांनी सांगितले. त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता पटेल यांनी दिली. त्यानंतर आमदार कदम यांनी जर ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला काळ्या यादीत टाका, असे आदेश आमदार कदम यांनी दिले.

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT