कोकण

प्रकाश कानूरकरांना शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार

CD

swt164.jpg
83137
पुणे : प्रकाश कानूरकर यांना राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करताना पूजा शुक्ला. सोबत डॉ. एकनाथ खेडकर, नारायणकुमार फड, डॉ. चैताली धरमशी आदी.

प्रकाश कानूरकर यांना
शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ः पुणे येथे नुकत्याच झालेल्या तृतीय राष्ट्रीय नवोपक्रम शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभात मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल, कट्टाचे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानूरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील प्रेसिंडेट हॉटेलमध्ये झालेल्या ग्लोबल मीडिया सेंटर, इंडिया यांनी आयोजित केलेल्या शैक्षणिक परिषदेमध्ये देशविदेशात कार्यरत असलेले २० तज्ज्ञ मार्गदर्शक सहभागी झाले होते. शिक्षक कानूरकर यांना त्यांनी केलेल्या शिक्षणक्षेत्रातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक बदलांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार 2023’ देऊन गौरविण्यात आले. कानूरकर यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टाचे विश्वस्त सेवानिवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. सोनू पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन सुधीर वराडकर, सहसचिव एस. डी. गावडे, सर्व संचालक, पदाधिकारी, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT