कोकण

चिपळूण ः काँग्रेमधील गळती वाढायला नको

CD

फोटो -rat१९p२.jpg ः२३L८३७७८
चिपळूण ः कापसाळ येथील शासकीय विश्रामगृह येथील विचारमंथन बैठकीला उपस्थित असणारे काँग्रेसप्रेमी, पदाधिकारी व कार्यकर्ते.

शिंदे गटात गेलेल्या ४ माजी नगरसेवकांबाबत नाराजी
चिपळूण काँग्रेसची बैठक ; कार्यकर्त्यानी मांडले रोखठोक विचार
चिपळूण, ता. १९ ः शिंदे गटात प्रवेश केलेल्या चार माजी नगरसेवकांच्या भूमिकेवर व प्रशांत यादव यांच्या तालुकाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर चिपळुणात काँग्रेसच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस पक्ष कधीही संपुष्टात येणार नाही. काँग्रेस पक्षाचा विचारांचा आलेख व पक्षाच्या प्रगतीचा आलेख वाढत राहो व उंचावत राहो, अशी आशा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.सर्वांपर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचविण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला.
पक्षातील माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात केलेला प्रवेश आणि तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा, या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत कितीही राजकीय त्सुनामी आली तरी पक्षाशी एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्ष एकसंघ ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. जुन्या-नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपले रोखठोक विचार आणि भूमिका मांडतानाच विचारमंथन केले.
शहरालगतच्या कापसाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरूवारी (ता. १६ फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाची विचारमंथन बैठक पार पडली. काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते इब्राहिम दलवाई यांनी पुढाकार घेऊन ही बैठक बोलावली होती. त्याला काँग्रेसप्रेमींनी प्रतिसाद दिला. या बैठकीत शिंदे गटात प्रवेश केलेल्या चार माजी नगरसेवकांच्या भूमिकेवर व प्रशांत यादव यांच्या तालुकाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षातील अजून काही पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा चिपळुणात सुरू आहे. त्याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चर्चा करताना लागलेली गळती रोखतानाच काँग्रेस पक्ष यापुढे एकसंघ ठेवण्याचा निर्धार केला. देशपातळीवर कार्यरत असलेला काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचलेला आहे. जुना एकमेव राजकीय पक्ष म्हणून ओळखला जाणारा पक्ष कधी हार मानणार नाही. हा पक्ष कधीही संपुष्टात येणार नाही. काँग्रेस पक्षाचा विचारांचा आलेख व पक्षाच्या प्रगतीचा आलेख वाढत राहो व उंचावत राहो, अशी आशा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
बैठकीत निष्ठावंत, ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी चर्चेत सहभागी होऊन मते मांडली. सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहुयात, प्रामाणिकपणे काम करून याहीपेक्षा पक्षसंघटना कशी वाढेल व मजबूत होईल, सर्वांपर्यंत काँग्रेसचे विचार कसे पोहोचतील ही नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वीकारूया, असाही संकल्प करण्यात आला. या बैठकीला जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा रवीना गुजर, ॲड. जीवन रेळेकर, माजी नगरसेविका गौरी रेळेकर, वासुअप्पा मेस्त्री, अशोक भुस्कुटे, शकील तांबे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रशांत यादव यांची अनुपस्थिती
चार माजी नगरसेवकांच्या शिंदे गटातील प्रवेशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचेही जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानाने चिपळूण काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. तर प्रशांत यादव हे देखील शिंदे गटात जाणार, अशी जोरदार चर्चा चिपळुणात सुरू आहे. अशा परिस्थितीत चिपळुणात आयोजित केलेल्या विचारमंथन बैठकीलाही प्रशांत यादव अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT