कोकण

कोलगाव अंगणवाडीमध्ये वेशभूषा स्पर्धेस प्रतिसाद

CD

swt198.jpg
83801
सावंतवाडी : अपर्णा कोठावळे यांना शिवरायांची मूर्ती भेट देताना अंगणवाडी सेविका व महिला.

कोलगाव अंगणवाडीमध्ये
वेशभूषा स्पर्धेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः कोलगाव-म्हापसेकर टेंब येथील अंगणवाडी क्रमांक ३ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १८ मुलांनी सहभाग दर्शविला. शिवाजी महाराज, जिजामाता, बाजी प्रभू, सईबाई, येसूबाई अशी विविध रुपे मुलांनी साकारली. ''जय शिवाजी जय भवानी'', ''हर हर महादेव च्या'' घोषणांनी प्रत्येक मुलांनी आपली कला साभिनय सादर केली.
यावेळी अपर्णा कोठावळे यांनी बालशिवाजीच्या कथा सांगून आपण देखील त्यांचे योग्य आचरण करावे. अभ्यासासोबत खेळ, वाचन, पाठांतर या गोष्टी आयुष्यात महत्वाच्या आहेत, हे विविध उदाहरणांनी पटवून दिले. अंगणवाडी शाळेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी भेट दिली. सर्व मुलांना शालोपयोगी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेमध्ये आरोही धुरी, ऋव्ही कदम, मानसी जाधव यांनी अनुक्रमे प्रथम तीन, तर उत्तेजनार्थ महादेव धुरी व कलश चव्हाण यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमास अदिती कोठावळे, अंगणवाडी शिक्षिका परणिका कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मदतनीस दळवी, आशा स्वयंसेविका गोवेकर व पालक वर्गासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना परणिका कांबळे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT