कोकण

कांदळगाव येथे शिवरायांना वंदन

CD

swt1927.jpg
83894
कांदळगावः शिवाजीचा वड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

कांदळगाव येथे शिवरायांना वंदन
मालवण : कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर समोरील शिवाजीचा वड या ठिकाणी आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वडाचे एक रोपटे लावले होते. हे स्थळ ''शिवाजीचा वड'' म्हणून ओळखले जाते. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कांदळगाव ग्रामपंचायत, देवस्थान पदाधिकारी, ग्रामस्थ शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपसरपंच दिव्या बागवे, सदस्य कदम, मुळये, ग्रामसेवक सागर देसाई, आशिष आचरेकर, गजानन सुर्वे, कांदळगाव देवस्थानचे उपसचिव विशाल राणे, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, साळकर, सावंत यांच्यासह युवावर्ग, शिवप्रेमी उपस्थित होते.
.................
swt1928.jpg
83895
मालवणः नीलेश राणे यांच्या सूचनेनंतर तारकर्ली येथे रस्ताकामास प्रारंभ करण्यात आला.

नीलेश राणेंच्या दणक्यानंतर
तारकर्लीत रस्ताकाम सुरू
मालवण, ता. 19 : तारकर्ली रांज नाला येथील पुलाच्या कामाची मुदत संपूनही जोडरस्त्याचे काम मार्गी न लागल्याने माजी खासदार नीलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत बांधकामच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. अखेर त्यांच्या दणक्यानंतर रांज नाला जोडरस्त्याच्या कामास सुरुवात झाली. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाच्या कामाची मुदत संपूनही ते काम अपूर्ण होते. परिणामी ग्रामस्थ व पर्यटकांना या मार्गावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी भेट देत अपूर्ण काम व जोडरस्त्यांचे काम तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत कार्यवाही न झाल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार बांधकामने संबंधित ठेकेदारास पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर आजपासून या पुलाच्या जोडरस्ता कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
.................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT