कोकण

मंडणगड - दिवंगत चंद्रकांत मोडकलेना नाट्यातून आदरांजली

CD

-rat२०p८.jpg --KOP२३L८४०१०ः
मुंबई ः दिवंगत विनोदी कलाकार चंद्रकांत मोडकले यांना आदरांजली वाहताना सहकलाकार.

चंद्रकांत मोडकलेंना नाट्यातून आदरांजली
गाडी चुकलीचा प्रयोग; जमा २५ हजार रुपये कुटुंबीयांना सुपूर्द
मंडणगड, ता. २० ः मंडणगड तालुक्यातील वडवली गावचे सुपुत्र आणि विनोदी अभिनेते चंद्रकांत मोडकले यांचे २१ सप्टेंबर २०२२ ला आकस्मिक निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या सहकारी टीमकडून नाट्यप्रयोग लावून तिकिटातून जमा झालेली २५ हजारांची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. हा प्रयोग १२ फेब्रुवारीला बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात पार पडला.
आता उठवू सारे रान या नाटकातील त्यांची नाना भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली इतका सुंदर अभिनय त्यांनी करून लोकांना हसवलं होतं. घरकुटुंब सांभाळत कला जपणारे कोकणातील असंख्य कलाकार मुंबईत मनोरंजन कार्यक्रम सादर करतात. घरचा कर्ता कमावता असा अचानक निघून गेला या भावनेने ''आता उठवू सारे रान''चे लेखक दिग्दर्शक सुनील माळी यांनी सहकारी विणा कलामंचचे गोविंद गोरीवले आणि श्री गणेश कलामंचचे संपदा झिंगाडे यांनी पुढाकार घेत या आपल्या लाडक्या दिवंगत हास्य कलाकार मोडकले यांना कलेतून आदरांजली वाहण्यास ''गाडी चुकली.. आणि'' या नाट्यकृतीचे सादरीकरण रविवारी (ता. १२) फेब्रुवारीला बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात झाले. तिकिटातून जमलेली रक्कम वडवली ग्रामस्थ मंडळाकडे सुपूर्द करताना संपदा झिंगाडे या नृत्य दिग्दर्शकिने आणि गोविंद गोरीवले, सुनील मांडवकर यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणी जागवल्या. गोरीवले यांनी रचलेले आणि भाविनी सावंत हिने गायलेले गीते उपस्थितांना भावुक करून गेले. नाट्यकृती लेखक दिग्दर्शक सुनील माळी आणि कलाकार टीमने जबरदस्त उत्तम पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT