कोकण

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

CD

पान ५ साठी


८४३६९
राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत
फाटक हायस्कूलचे यश
रत्नागिरी : हिंगोली येथे झालेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फाटक हायस्कूलच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत संघाने तृतीय क्रमांक मिळविला. ब गटात फाटक हायस्कूलचा पहिला सामना नाशिक विभागाबरोबर झाला. त्यात नाशिक विभागाला सलग दोन सेटमध्ये २२-२५, ०४-२५ पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यात लातूर संघाने २२-२५, ११-२५ असे पराभूत केले. ब गटातून कोल्हापूर आणि अ गटातून पुणे असे दोन संघ तृतीय क्रमांकाच्या सामन्यासाठी एकत्र आले. या सामन्यात सलग दोन सेटमध्ये १९-२५, २०-२५ पुणे विभागाचा पराभव करीत फाटक शाळेच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेत फाटक हायस्कूलने सहभाग घेऊन यश मिळविले. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक मंदार सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे व मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. लेले व सर्वांनी अभिनंदन केले.

८४३६८
शिवकिल्ला स्पर्धेत विसपुते हायस्कूल प्रथम
रत्नागिरी : मराठा मंदिर ग्लोबल स्कूल आणि यूथ फेस्टिव्हल आर्टिस्ट असोसिएशन आयोजित शिवकिल्ला स्पर्धा मराठा मंदिर ग्लोबल स्कूलमध्ये झाली. कमलाबाई विसपुते हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक रा. भा. शिर्के प्रशालेने, तृतीय क्रमांक फाटक हायस्कूलने, तर उत्तेजनार्थ क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, पटवर्धन हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सीटी कॉन्व्हेन्ट स्कूल, देसाई हायस्कूल, माने इंटरनॅशनल स्कूलने पटकावला. आविष्कार शाळेने विशेष पारितोषिक मिळविले. स्पर्धेत २९ संघ सहभागी झाले. प्रहर महाकाळ व मूर्तिकार स्वप्नील कदम यांनी परीक्षण केले. पारितोषिक वितरणाला स्पर्धाप्रमुख ओंकार बंडबे, स्पर्धेचे आयोजक सचिन लांजेकर, अॅड. सूरज बने, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी आणि मराठा मंदिरचे मुंबई ट्रस्टी संतोष नलावडे, प्रतापराव सावंतदेसाई, भाऊ देसाई, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष केशवराव इंदुलकर उपस्थित होते. मुख्याध्यापक कविता विश्वकर्मा, ग्लोबल स्कूलच्या सचिव ममता नलावडे यांचे विशेष सहकार्य मिळाले. यूथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनचे मुख्य समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी आभार मानले.

भाजप कुवारबाव, स्वाभिमान
क्लबतर्फे शिवजन्मोत्सव
रत्नागिरी : कुवारबाव येथील भाजप आणि स्वाभिमान स्पोर्टस क्लबतर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत कुवारबाव गावांमधून मिरवणूक काढण्यात आली. नंतर भाजप कार्यालयात सत्यनारायण पूजा झाली. चिंचखरी येथील श्री समर्थ भजन मंडळाचे भजन व आकार डान्स ॲकॅडमीतर्फे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. या वेळी माजी आमदार बाळ माने, जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लीलाधर भडकमकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. नाना शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुशांत पाटकर, संकेत कदम, ययाती शिवलकर उपस्थित होते.

८४३९६

चिन्मयी बेहेरेचे सुयश
रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या चिन्मयी केतन बेहेरे हिने संगीत प्रारंभिक परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. रत्नागिरीतील एकूण १०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गांधर्व महाविद्यालय हे गायन, नृत्य, वादन या क्षेत्रात परीक्षा घेते. संपूर्ण भारतात या परीक्षांचे नियोजन होते. राज्य शासनानेही या परीक्षांना एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला आहे. मुकुल माधव विद्यालयात रोजच्या अभ्यासाप्रमाणेच इतर कलागुणांनाही वाव दिला जातो. त्याप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत संगीत, तबला वादन, कराटे याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून मुकुल माधव विद्यालयातील संगीत शिक्षिका प्राजक्ता जोगळेकर यांनी चिन्मयीला मार्गदर्शन केले व तिने यश संपादन केले. चिन्मयीच्या यशाबद्दल मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT