कोकण

कैद्यांना बेड उशीची परवानगी

CD

rat२२१३.TXT

( टुडे पान १ संक्षिप्त )

कैद्यांना स्वःखर्चाने बेड, उशीची परवानगी

रत्नागिरी, ता. २२ ः पन्नासपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना स्वःखर्चाने जाड बेडिंग व उशी आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसे निर्देश राज्यातील सर्व कारागृहातील अधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे दिले गेले आहेत.
अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व अधीक्षक यांच्या कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून घेऊन त्या दूर होण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपायोजनांबाबतची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कारागृहामध्ये वय वर्षे ५० व त्यापेक्षा जास्त वय असलेले बंदी बंदिस्त असतात. त्यात काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. या बाबींचा सारासार विचार करून ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणत: जाड बेडिंग (अंथरुण) तसेच उशी स्वःखर्चाने आणण्याची परवानगी देण्याच्या सूचना उपस्थित सर्व अधिकाऱ्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार परवानगी अधिकाराबाबत सर्व प्रादेशिक विभागप्रमुख व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे, असे पुणे कारागृहाचे जनसंपर्क अधिकारी एस. बी. दराडे यांनी कळवले आहे.
--
हर्णै-पाजपंढरी-कणेरी मठ बस सुरू

हर्णै ः हर्णै पाजपंढरी कोल्हापूर कणेरी मठ बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरू झाल्यामुळे सिद्धगिरी मठाकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. येथील भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. ही बससेवा सुरू करावी अशी मागणी महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्याकडे करण्यात आली होती.
हर्णै पाजपंढरी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार ही बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही बस पाजपंढरी येथून सकाळी ९.३१ वाजता सुटेल. ती वाकवली, फुरुस, खेड, लवेल, लोटे, पर्शुराम, चिपळूण शिवाजीनगर, चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक, पोफळी, शिरगाव, कोयनानगर, पाटण, कराड, पेठनाका, कोल्हापूर येथून कणेरी मठला सायंकाळी ५.४६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस रात्री ८.३१ वाजता कणेरी मठ येथून सुटेल. ती पाजपंढरी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३१ वाजता पोहोचेल. कणेरी मठ ते हर्णै पाजपंढरी या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक वाहतूक अधिकारी यामिनी जोशी, विभाग नियंत्रक प्रज्ञेष बोरसे, आगार व्यवस्थापक दापोली, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले, हर्णै पाजपंढरी ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक आदींनी केले आहे.
---
कोकणवासीयांना लागले शिमगोत्सवाचे वेध

साखरपा ः कोकणवासीयांचा आवडता सण शिमगोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला असून, कोकणवासीयांना सध्या शिमगोत्सवाचे वेध लागले आहेत. दोन दिवसांनी शिमगोउत्सवाला सुरवात होत आहे. २४ फेब्रुवारीपासून पहिल्या होळीला सुरवात होत असून, गुढीपाडव्यापर्यंत चालणारा उत्सव कोकणवासीयांचा आवडता सण मानला जातो. गेली दोन वर्षे कोरोनाच्या दहशतीमुळे म्हणावी तितकी मजा लुटता न आल्याने यंदा मात्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याने आतापासूनच चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले असून कोकणवासीय शिमगोउत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT