कोकण

‘माझी कन्या भाग्यश्री’साठी २२ लाख

CD

‘माझी कन्या भाग्यश्री’साठी २२ लाख

संतोष भोसले; महिला व बालकल्याण खात्यातर्फे लवकरच लाभ

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या लाभर्थींना लाभ देण्यासाठी २२ लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे गतवर्षीपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्व पात्र लाभार्थींना लवकरच लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी आज दिली.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ घेण्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५५ प्रस्ताव प्राप्त आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ या वर्षात ४० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अशा एकूण ९५ लाभार्थींना प्राप्त निधीतून लाभ देण्यात येणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून गतवर्षी निधी प्राप्त झाला नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत होते. यावर्षी शासनाकडून एकूण २२ लाख एवढा निधी प्राप्त झाला आहे.
ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंगनिवड प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे, आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी शासनाने १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारित योजना लागू केली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार पर्यंत आहे, अशा सर्व समाजातील घटकांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेत एका मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे ५० हजारचे मुदत ठेव बचत प्रमाणपत्र केले जाते. दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये अशी ५० हजार रूपये इतकी रक्कम मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येते. या योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ ला जन्मलेल्या व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना देण्यात येतो. एखाद्या कुटुंबात १ ऑगस्ट २०१७ पूर्वी एक मुलगी आहे व त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास फक्त दुसर्‍या मुलीला २५ हजार रूपये इतका लाभ देण्यात येतो; मात्र, मुलगा जन्मल्यास या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
-------
ग्राफ
वर्षनिहाय आलेले प्रस्ताव
२०१७-१८*३४
२०१८-१९*६२
२०१९-२०*४८
२०२०-२१*५६
२०२१-२२*५५
२०२२-२३*४०
---------
कोट
गतवर्षी या योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. आता शासनाकडून या योजनेसाठी एकूण २२ लाख निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सर्व लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे. मार्चपूर्वी सर्व पात्र लाभार्थींना लाभ दिला जाईल.
- संतोष भोसले, महिला व बालकल्याण अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT