कोकण

जिल्ह्यात महावितरणची 21 कोटी लाखाची थकबाकी

CD

rat०२१३.txt

बातमी क्र.. १३ (पान २ साठी, अॅंकर)

जिल्ह्यात महावितरणची २१ कोटीहून अधिकची थकबाकी

८५ हजार ४४६ ग्राहकांचा समावेश ; वसूल करण्याचे मोठे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः महावितरण कंपनीची थकबाकी काही कमी होताना दिसेना. जिल्ह्यातील ८५ हजार ४४७ ग्राहकांकडून तब्बल २१ कोटी ९० लाख एवढी थकबाकी आहे. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के रक्कम ही वीज खरेदीवर खर्च होते. त्यामुळे थकबाकीची वसुली हाच एक उपाय महावितणपुढे आहे. त्यामुळे वीजजोडणी तोडण्याचे कठोर पाऊल महावितरण कंपनीला उचलावे लागत आहे.
जिल्ह्यात महावितरणची थकबाकी अजूनही कोटींच्या घरात आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे महावितरणसमोर आव्हान आहे. सध्या जिल्ह्यात ८५ हजार ४४७ ग्राहकांकडून २१ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मुख्यत्वे चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागात मिळून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक अशी मिळून ७२ हजार ३८८ ग्राहकांकडे ७ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही विभागात मिळून कृषीची ६ हजार ८५६ ग्राहकांकडे १ कोटी २० लाख, अकृषी व अन्यमध्ये १ हजार ७२२ ग्राहकांकडे ९३ लाख, पथदीपच्या १ हजार ४९८ स्थानिक स्वराज संस्थांकडे ९ कोटी ३४ लाखांची थकबाकी आहे. या शिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ९७९ ग्राहकांकडे १ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. अन्य सार्वजनिक सेवांच्या २ हजार ४ ग्राहकांकडे १ कोटी ५ लाखांची थकबाकी आहे. सर्व मिळून जिल्ह्यात महावितरणची २१ कोटी ९० लाखांची थकबाकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही सार्वजनिक पथदिव्यांची आहे. त्यानंतर घरगुती थकबाकी असल्याने वेळीच बिल भरून कारवाई टाळा, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
---
कोट
ग्राहकांनी नियमितरित्या वेळच्या वेळी बिले भरली तर बिलांद्वारे महावितरणला पैसे प्राप्त होतात आणि त्यानंतरच कंपनीला वीज खरेदी करणे व त्याचा पुरवठा ग्राहकांना करणे शक्य होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांनी वेळच्या वेळी बिले भरून महावितरणला सहकार्य करावे.
-नितीन पळसुलेदेसाई, अधीक्षक अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT