कोकण

क्राईम पट्टा

CD

rat०२२७. txt

बातमी क्र.. २७ (पान ३ साठी)

पाली बाजारपेठेतून दुचाकीची चोरी

रत्नागिरी ः तालुक्यातील पाली-बाजारपेठ येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. १) सकाळी सव्वाआठ ते पावणेनऊच्या सुमारास पाली बाजारपेठ न्यू अंबिका स्वीट या दुकानासमोर रस्त्यावर घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय विष्णू क्षीरसागर (वय ३६, रा. सुतारवाडी, पाली, रत्नागिरी) हे कामानिमित्त बाजारपेठ येथे गेले होते. त्यांनी त्यांची दुचाकी पाली-बाजारपेठ येथे पार्क केली होती. चोरट्याने ती पळवली. या प्रकरणी क्षीरसागर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. --
अनोळखी महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः प्रादेशिक मनोरुग्णालयात गेली नऊ महिने उपचार घेत असलेल्या रुग्ण महिलेला अशक्तपणा जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. जया (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही. रा. प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १) दुपारी जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनोळखी जया या गेली नऊ महिने मनोरुग्णालयात उपचार घेत होत्या; मात्र २ ते १३ फेब्रुवारीला त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--
मुरुड सालदुरे येथे गावठी दारु जप्त

दाभोळ : दापोली तालुक्यातील मुरुड सालदुरे मार्गावरील मुरुड खाडीकिनारी झाडाच्या आडोशाला विनापरवाना गावठी दारू विकणाऱ्याकडून पोलिसांनी ५०० रुपये किमतीची १० लिटर गावठी जप्त केली. दापोली पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेश लक्ष्मण कडू (वय ५९) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार २७ फेब्रुवारीला पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानुसार ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास हेड कॉनस्टेबल दीपक गोरे करत आहेत.
---

गावठी दारूसाठा प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा

दाभोळ : दापोली तालुक्यातील विसापूर-पाथरी कोंड येथे विनापरवाना गावठी दारू ताब्यात ठेवल्याप्रकरणी संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नम्रता गणवे (वय ४०) असे संशयित महिलेचे नाव आहे. हा प्रकार २७ फेब्रुवारी सायंकाळी निदर्शनास आला. पोलिसांनी ३२० रुपये किमतीची ५ लिटर गावठी दारू जप्त केली. संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT