कोकण

शेठ म. ग. हायस्कूलचा वर्धापनदिन उत्साहात

CD

86725
देवगड : येथील शेठ म. ग. हायस्कूलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

शेठ म. ग. हायस्कूलचा
वर्धापनदिन उत्साहात
देवगड, ता. ३ : येथील शेठ म. ग. हायस्कूलचा १०५ वा वर्धापनदिन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक सुनील घस्ती, स्थानीय समितीचे सदस्य मिलिंद कुबल, अनुश्री पारकर आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शालेय ध्वज फडकवण्यात आला. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करुन १०५ वी ज्योत पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या ‘श्रीराम’ या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर वर्गवार विद्यार्थ्यांनी केलेल्या हस्तलिखितांचे देखील प्रकाशन करण्यात आले. यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रतिकृती मधून काढण्यात आलेल्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक तसेच इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमधील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमधील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेतील सहाय्यक शिक्षक रोहित बांदिवडेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जाहीर केलेला आदर्श विद्यार्थी पुरस्कार राज्ञी विवेक कुलकर्णी आणि भक्ती राणे या विद्यार्थ्यांना देऊन त्यांनाही गौरविण्यात आले. यावेळी २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेटवस्तू दिल्या. सूत्रसंचालन सागर कर्णिक यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक सुनील गस्ती यांनी केले. मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी आभार मानले. दरम्यान, शाळेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या ‘बुरगुंडा’ या नाटिकेचा प्रयोग सादर करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT