कोकण

संक्षिप्त

CD

शिमगोत्सवासाठी रोहा-चिपळूण मार्गावर मेमू
रत्नागिरी : शिमगोत्सवासाठी रोहा चिपळूण मार्गावर मेमू सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ४ ते १२ मार्चपर्यंत मेमू स्पेशलच्या नियमितपणे १२ फेर्‍या धावणार आहेत. रेल्वे गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवात रोहा-चिपळूण मार्गावर चालवण्यात आलेल्या मेमू सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. चाकरमान्यांनी शिमगोत्सवातही मेमू स्पेशल चालवण्याची आग्रही मागणी केली होती. विशेषतः जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला होता.
अखेर रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी कमी करून सुखकर प्रवासासाठी मध्य रेल्वेने रोहा-चिपळूण दरम्यान, १२ मेमू सेवा जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यानुसार मेमू रोहा येथून दररोज सकाळी ११.०५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १.२० वाजता चिपळूण येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात चिपळूण येथून दुपारी १.४५ वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता रोहा येथे पोहचेल. ही स्पेशल माडगाव, वीर, साापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात थांबेल.

-------

सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्यासाठी हालचाली

चिपळूण : नूतनीकरण होवून देखील तांत्रिक अडचणीमुळे रखडून पडलेल्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या असून वातानुकुलीत यंत्रणा तसेच अग्निशमन यंत्रणांच्या कामासाठी पावणेदोन कोटींची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कामे लवकर पूर्ण झाल्यास सांस्कृतिक केंद्र खुले होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नुतनीकरण दोन वर्षापूर्वीच पूर्ण झाले होते. सुमारे ७ कोटीहून अधिक निधी या कामावर खर्च झाला आहे. परंतु शेवटच्या घटकेला खुर्च्या खरेदीवरून मोठे राजकारण घडले. खुर्च्या खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप झाला.

------------

लोकशाही दिन ८ मार्च रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हाधिकारी यांच्याकडील अधिसूचनेनुसार होळीसाठी स्थानिक सुटया जाहीर करण्यात आल्या आहेत. ६ मार्च २०२३ रोजी होळी निमित्त स्थानिक सुट्टी व ७ मार्च रोजी धुलीवंदनाची शासकीय सुट्टी असल्याने लोकशाही दिन बुधवारी ८ मार्च रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. तसेच अर्जदारानी १५ दिवस अगोदर दोन प्रतीत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे, असे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी कळविले आहे.

------


काजरघाटीच्या महालक्ष्मीचा शिमगोत्सव सुरू

रत्नागिरी : तालुक्यातील पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी देवस्थानच्या शिमगोत्सवाला शुक्रवारपासून (ता. ३) मोठ्या उत्साहात सुरवात झाली. शुक्रवारी रुपे लावण्यात आली. ५ ते ८ मार्चपर्यंत पालखी मंदिरात राहणार आहे. ८ मार्चला दुपारी ११ वाजता पालखी शिंपण्यासाठी रामेश्वर मंदिरात जाईल आणि नंतर रामेश्वरवाडीतील गावभेट कार्यक्रम होणार आहे. ९ ते १५ मार्च या कालावधीत काजरघाटी गावभेट कार्यक्रम, १५ ते २० मार्च या कालावधीत कुवारबाव, गराटेवाडी, साईनगर गावभेट कार्यक्रम होणार असून २० ला सायंकाळी ७ वाजता पालखी मंदिरात आणण्यात येणार आहे. मंदिरात रुपे उतरवली जातील आणि शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. या शिमगोत्सवात ग्रामस्थांसह भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

-----

जिल्हा रुग्णालयात जागतिक श्रवण दिन

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय येथे जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आला. जागतिक कर्णबधिरता सप्ताहाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.के. फुले-गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक तथा एन सी डी नोडल ऑफिसर डॉ. व्ही. एम. कुमरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे, डॉ. शैलेश गावंडे, अधिसेविका श्रीम. शिरधनकर, परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दिवशी आयोजित प्रभातफेरीस जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रभातफेरीस सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT