कोकण

संक्षिप्त-रानबांबुळीत गुणवंत ग्रामस्थांचा सत्कार

CD

संक्षिप्त

रानबांबुळीत गुणवंत
ग्रामस्थांचा सत्कार
ओरोस ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या रानबांबुळी गावात विविध क्षेत्रांतील गुणवंत ग्रामस्थ, कार्यकर्त्यांचा सत्कार आणि स्वच्छता उपक्रम राबवत शिवजयंती साजरी केली. सरपंच परशुराम परब यांच्या नेतृत्वाखाली व पप्पा परब यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपसरपंच सुभाष बांबुळकर, प्रभाकर सावंत, माजी सरपंच वसंत बांबुळकर यांसह गावातील शिक्षक, रिक्षा व्यावसायिक, संघटना पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. पोलिस कॉलनी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत आणि छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळाच्या वतीने शिवरॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्‍घाटन सरपंच परब यांनी केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गुणवंत ग्रामस्थ, शिक्षक, रिक्षा व्यावसायिक, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

उसप येथे १४ ला
वक्तृत्व स्पर्धा
दोडामार्ग ः जिल्हा परिषद शाळा उसप नं. १ येथे १५ मार्चला सकाळी १० वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सिंधू साहित्य संघ, दोडामार्ग व शाळेच्यावतीने केले आहे. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. प्रत्येक प्रशालेतील केवळ दोनच स्पर्धक प्रत्येक गटात सहभागी होऊ शकतात. पाचवी ते सातवी लहान गट असून यासाठी ‘माझ्या स्वप्नातील आदर्श गाव’ व ‘वाचन माझा आवडता छंद’ या दोन विषयांसाठी तीन मिनिटांचा अवधी आहे. आठवी ते नववी हा मोठा गट असून ‘माझा आवडता साहित्यिक’ आणि ‘मोबाईल खेळ घातक व्यसन’ या दोन विषयांसाठी पाच मिनिटांचा अवधी आहे. प्रत्येक गटासाठी २०००, १५०० व १००० रुपये, चषक, प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ एका स्पर्धकाला बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी उद्यापर्यंत (ता. ६) रघुनाथ सोनवलकर, सतीश धर्णे यांच्याकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

‘कृषी’च्या विद्यार्थ्यांची
अनोखी शिवजयंती
वैभववाडी ः कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. असलदे येथील वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसमवेत शिवजयंती साजरी करीत त्यांच्यासोबत संवाद साधला. या उपक्रमातून वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. एक दिवसासाठी का होईना, वृध्दांच्या सुख-दुःखाचा भाग झाले. त्यांना उपहार, पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमास प्रा. चेतन वाडेकर व सर्व प्राध्यापकांनी प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वाढवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवत केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

कलमठला क्रिकेट
स्पर्धेचे आयोजन
कणकवली ः संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे ८ ते १२ मार्चदरम्यान आशिये माळावरील मैदानावर कलमठ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी ३०,००० रुपये व चषक तसेच २०,००० रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक, अंतिम सामन्यातील सामनावीर, प्रत्येक सामन्यातील सामनावीरास आकर्षक चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत. सहभागी खेळाडूंना टी-शर्ट आणि ट्रॅक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कलमठ, वरवडे, वागदे, आशिये, सातरल, कासरल, तरंदळे, पिसेकामते, जानवली, बीडवाडी या गावातील खेळाडू सहभाग घेणार आहेत. मागील २० वर्षांपासून संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने क्रेझीबॉय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते.

खासदार राऊतांकडून
‘पोंभुर्ले’साठी ८७ लाख
ओरोस ः जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदार संघाला विविध कामांसाठी तब्बल ८७ लाखांचा निधी खासदार विनायक राऊत यांनी मंजूर करून दिला आहे. प्राथमिक शाळा फणसगाव गुरवभाटले नवीन इमारत बांधकाम २ वर्गखोल्यांसाठी २४ लाख रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाद-भोळेवाडी नवीन इमारत दोन वर्गखोल्यांसाठी २४ लाख रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धालवली उर्दूच्या दुरुस्तीसाठी ६ लाख रुपये, इतर जिल्हा मार्ग विकास कार्यक्रम अंतर्गत देवगड, धालवली-कोर्ले, तळीवाडी, नरसाळे, फणसगाव, चव्हाटा मार्ग रस्ता १५ लाख रुपये, देवगड, फणसगाव, पेंडूरकरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे १० लाख रुपये, जनसुविधेंतर्गत देवगड, धालवली-कोर्ले तळीवाडी ते जुगाई मंदिरापर्यंत खडीकरण, डांबरीकरण करणे ८ लाख रुपये असा निधी मंजूर केला आहे.

दाभोलीत बुधवारी
महिलांसाठी स्पर्धा
वेंगुर्ले ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दाभोली न्यू इंग्लिश स्कूल येथे ८ मार्चला दाभोली पंचक्रोशीतील प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महिला पालकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे (फक्त दाभोली पंचक्रोशी मर्यादित प्राथमिक व माध्यमिक शाळा) आयोजन केले आहे. ‘स्त्री शक्ती’, ‘खरंच स्त्रीयांना न्याय मिळतो काय?’ आणि ‘भारतीय संस्कृती व महिला’ हे विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी, तर ‘स्त्री- काल, आज, उद्या’, ‘क्रीडा क्षेत्रातील महिलांचे योगदान’, ‘ग्रामीण जीवनाचा स्त्री कथा-व्यथा’ हे विषय निबंध स्पर्धेसाठी दिले आहेत. प्रथम तीन विजेत्यांना (कै.) गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री मंचातर्फे बक्षिसे देण्यात येणार आहेत.

भडगाववासीयांची
अभ्यास सहल
कडावल ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत भडगाव बुद्रुक यांच्यातर्फे गावातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी १ दिवशीय जिल्हा अंतर्गत शेतकरी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तळवडे येथील कॅलिफोर्निया गोट फार्म, वेंगुर्ले नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, खतनिर्मिती, वेंगुर्ले महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा काथ्या उद्योग, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, गांडूळ खत प्रकल्प, अशा अनेक ठिकाणांना भेट देण्यात आली. यामध्ये भडगाव सरपंच प्रणिता गुरव, उपसरपंच तुळशीदास गुरव, ग्रामसेवक अनिला घुगरे, ग्रामपंचायत सदस्या स्नेहल नाईक, नीलम लाटे, प्रिया गुरव तसेच गावातील शेतकरी, महिला बचतगट सदस्या अशा एकूण ८५ जणांचा सहभाग होता. प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत व समीर शिर्के उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT