कोकण

दाभिळ खाडीत सक्शन पंपाने वाळू उपसा

CD

rat०७३४.txt

बातमी क्र..३४ ( पान ३ )


फोटो : rat७p२६.jpg ः
८७३६०
दाभिळ ः येथील खाडीत वाळू उपसा करण्यासाठी लावलेले सक्शन पंप.

दाभिळ खाडीत सक्शन पंपाने वाळू उपसा

ग्रामस्थांचा आरोप ; शासनाचा बुडतो महसूल

दाभोळ, ता. ७ ः दापोली तालुक्यातील दाभिळ खाडीत मोठ्या प्रमाणात सक्शन पंपाने वाळू उपसा गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडित जात आहे. या खाडीत तीन ठिकाणी सक्शन पंप लावण्यात आले. महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकीकडे शासनाने वाळू उपसा करण्यास बंदी आणली आहे. असे असताना दाभिळ खाडीत वाळू उपशाला फक्त मुभा आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत दापोली तहसीलदार यांच्याकडेदेखील या उपशाबाबत नागरिकांनी तक्रारी आहेत. रोज सायंकाळी दाभिळ खाडीत सक्शनपंपांची घरघर सुरू असते. एके ठिकाणी हातपाटी वाळू उपशाची परवानगी घेण्यात आली असली तरी या ठिकाणी सक्शनपंपाने वाळू उपसा केला जात असून, जेसीबीच्या साह्याने वाळू उपसली जात आहे. मुख्य मार्गावर सक्शनपंपाने वाळू उपसा सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. दाभिळ खाडीकिनारी खारफुटीची झाडे आहेत. या झाडांची वाळूमाफिया कत्तल करून वाळू व्यवसाय थाटला आहे; मात्र त्यांच्यावर पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करण्यास महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : 'राजधानी'त भिडणार दिल्ली-मुंबई, कोण जिंकणार?

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT