कोकण

वासुदेव तुळसणकरनी दिले गाळ उपशासाठी 10 हजार

CD

rat९३०.txt

बातमी क्र. ३० (पान ५ साठी)


rat९p३१.jpg -
८७९७४
राजापूर ः गाळ उपशाचा सुरू असलेल्या कामासाठी अधिक निधीची गरज आहे.

वासुदेव तुळसणकरनी दिले गाळ उपशासाठी १० हजार

राजापूर, ता. ९ : नाम फाऊंडेशनचे सहकार्य, महसूल विभाग आणि नगर पालिकेचा पुढाकार आणि लोकसहभाग याच्यातून शहरातून वाहणाऱ्‍या कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम सुरू आहे. या कामासाठी लोकवर्गणीतून निधीची उभारणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असताना ओणी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सुप्रभा पतसंस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी गाळ उपशाच्या कामासाठी १० हजार रूपयांची रोख मदत केली आहे.
शहरातून वाहणाऱ्‍या अर्जुना आणि कोदवली नदीपात्रामध्ये वर्षानुवर्षाचा मोठ्याप्रमाणात गाळाचा संचय झालेला आहे. साचलेल्या या गाळामुळे पावसाळ्यामध्ये वारंवार पूरस्थिती निर्माण होते. पूरस्थितीची ही समस्या राजापूरकरांची वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरलेली आहे. या समस्येतून सुटका होण्यासाठी नदीपात्रातील गाळाचा गेल्या काही दिवसांपासून उपसा सुरू आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध होताना लोकसहभागातूनही मोठ्याप्रमाणात निधीची उभारणी करण्यात आली आहे. त्याचवेळी नाम फाऊंडेशनकडून गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. गाळ उपशाच्या कामासाठी अद्यापही निधीची आवश्यकता असून या निधीच्या उभारणीचे काम अद्यापही सुरू आहे. गाळ उपशाच्या कामासाठी आर्थिक मदत देवून श्री. तुळसणकर यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT