कोकण

पत्रकार कल्याण निधी वाढ तुटपुंजी

CD

88226
रवींद्र बेडकिहाळ

पत्रकार कल्याण निधी वाढ तुटपुंजी

रवींद्र बेडकिहाळ; पुनर्विचार करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १० ः राज्याकडून नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शासनाच्या शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये ५० कोटींच्या वाढीव तरतुदीची घोषणा केली; मात्र, जाहीर केलेली ही वाढ तुटपुंजी असल्याचे मत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले. पत्रकार संघटनांच्या मागण्यांचा पुनर्विचार करुन आगामी पुरवणी अर्थसंकल्पात याबाबत योग्य ती तरतूद करावी, अशी त्यांची मागणी आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये पत्रकारांच्यादृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये असणाऱ्या आधीच्या ५० कोटीमध्ये आणखी ५० कोटीची भर घालणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे हा निधी आता १०० कोटी एवढा होणार आहे. वास्तविक पाहता या निधीमधून राज्यातील ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, राज्यातील पत्रकारांना आरोग्य सुविधा दिली जाते. पत्रकारांची वाढती संख्या, वाढते वैद्यकीय खर्च व महागाई यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना अपुरी पडणारी सन्मान निधीची रक्कम, वास्तविक निधीच्या अभावामुळे पण इतर तांत्रिक कारणे पुढे करत नाकारले जाणारे सन्मान निधीचे तसेच वैद्यकीय मदतीचे अर्ज या व अशा विविध पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये १ हजार कोटीची कायमस्वरुपी तरतूद करावी, अशी मागणी आपल्यासह इतरही पत्रकार संघटनांनी शासनाकडे केली होती. मात्र पत्रकारांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या मागण्यांकडे शासनाने दूरदृष्टीने विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे या मागण्यांचा पुनर्विचार करुन आगामी पुरवणी अर्थसंकल्पात याबाबत योग्य तरतूद करावी, अशी श्री. बेडकिहाळ यांनी मागणी केली आहे.
.........
चौकट
महामंडळाचे काय झाले?
समाजातील विविध घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या विकास महामंडळांच्या धर्तीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असणाऱ्या ‘पत्रकार’ या समाजातील महत्वपूर्ण घटकासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यम महामंडळ’ याची स्थापना करावी, अशीही मागणी केली होती, असेही बेडकिहाळ यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT