कोकण

मंगळवारपासून कामबंद

CD

rat११७.txt

बातमी क्र..७ (पान २ साठी)

फोटो ओळी
-Rat११p१०.jpg ः
८८३२६
मंडणगड ः राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंडणगड येथे पूर्वतयारीकरिता आलेले कर्मचारी समन्वय समितीचे पदाधिकारी व स्थानिक कर्मचारी.
--
शासकीय कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून कामबंद

दहा मागण्यांसाठी आंदोलन ; जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही

मंडणगड, ता. ११ ः सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सध्याची एनपीएस ही पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी व अन्य प्रलंबित मागण्यासाठी १४ मार्चपासून बेमुदत संप आयोजित करण्यात आला आहे.
समन्वय समितीने येथील तहसील कार्यालयात या संदर्भात नुकतीच सभा घेतली असून संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे समितीचे नियोजन आहे. या संपात तालुक्यातील सर्व स्तरातील समस्याग्रस्त कर्मचारी सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. सर्व प्रकारचे कर्मचाऱी करत असलेला संघर्ष ऐतिहासिक ठरणार आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भातील घोषणा केल्याशिवाय मागे न हटण्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. पीएफ, आरडीए कायदा रद्द करा, कंत्राटी, अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमीत करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त करा, चतुर्थश्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक-शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करा, आठव्या वेतन आयोग स्थापनेची कार्यवाही सुरू करा या दहा मागण्यांचा समावेश आहे. समन्वय समिती रत्नागिरी अध्यक्ष सुरेंद्र भोजे, सचिव चंद्राकांत चौघुले, कार्याध्यक्ष दिनेश सिनकर, सचिव सागर पाटील रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व स्तरातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT