कोकण

गुहागर ः ऑफ्रोहचा आक्रोश मोर्चा 16 मार्चला विधाभवनावर धडकणार

CD

ऑफ्रोहचा १६ ला विधानभवनावर आक्रोश मोर्चा
गुहागर, ता. ११ः अनुसूचित जमातीप्रमाणेच आदिवासी जमातींचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे आणि अनुसूचित जमातींच्या सर्व योजना अनुसूचित क्षेत्राबाहेरील आदिवासींना लागू करा या मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमनतर्फे (ऑफोह) १६ मार्चला ३३ अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या आक्रोश मोर्चाचे मुंबईत आयोजन केल्याची माहिती ऑफोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा अनघा वैद्य, प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी दिली आहे.
तेहत्तीस अन्यायग्रस्त जमातीला न्याय मिळत नसेल तर विस्तारित क्षेत्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्यांना हटवा, अनुसूचित जमाती जात-प्रमाणपत्र तपासणी समितीने ’प्रधान’ जमातीचे, ’आंध’ यांना ’अंध’ जमातीचे, ’बुरूड’ यांना ’गोंड’ जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समितीची व अधिकार्‍यांची चौकशी करा या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे १६ मार्चला सकाळी ११ वाजता आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अन्यायग्रस्त आदिवासी समाजबांधवांनी व कर्मचार्‍यांनी मोठ्या प्रमाणात या मोर्चात विस्तारित क्षेत्रातील हलबा, हलबी, कोळी महादेव,माना, गोंडगोवारी, राजगोंड, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी व तत्सम कोळी, ठाकूर, ठाकर, धनगड, धनगर, मन्नेवार, मन्नेवारलू, राज, धोबा, छत्री, सोनझरी, पावरा, भिल्ल आदी ३३ अन्यायग्रस्त जमातीच्या कर्मचारी आणि समाजबांधवांना मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन ऑफोहतर्फे प्रसिद्धीप्रमुख व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT