कोकण

वैभववाडीतील उपोषण अखेर स्थगित

CD

wt१३३५.jpg
८८८८३
वैभववाडीः महिला स्टॉलधारकांना नायब तहसीलदार सकेंत यमगर यांनी पत्र दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

वैभववाडीतील उपोषण अखेर स्थगित
स्टॉल प्रश्नः सहा दिवसांनंतर ठोस आश्वासनाशिवाय माघार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ः स्टॉल हटविल्यामुळे संतप्त झालेल्या महिला स्टॉलधारकांनी गेल्या सहा दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय आज (ता. १३) सायकांळी स्थगित करण्यात आले. त्याकरिता उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख मंगेश लोके आणि तानाजी कांबळे यांनी शिष्टाई केली. उपोषणकर्त्या एका महिलेची प्रकृती खालावल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहरातील स्टॉल हटविल्यानंतर संतप्त झालेल्या २० ते ३० महिला स्टॉलधारकांनी येथील तहसील कार्यालयासमोर महिला दिनापासून उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांनी तर दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी स्टॉलधारकांशी चर्चा केली. त्यानंतर या उपोषणाची प्रशासनाने अपेक्षित दखल घेतली नाही. उपोषणकर्त्या महिलांपैकी तिघींची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर देखील हे उपोषण सुरूच होते. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार स्टॉलधारकांनी केला; परंतु आज पुन्हा एका उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती बिघडली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके, धरणग्रस्त समितीचे तानाजी कांबळे यांनी स्टॉलधारकांशी चर्चा केली. महसूलसह सर्व शासकीय कर्मचारी संपावर जात असल्यामुळे उपोषण सुरू ठेवणे योग्य होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी नायब तहसीलदार संकेत यमगर, नायब तहसीलदार के. आर. कुवळेकर यांच्याशी चर्चा करीत स्टॉलधारकांना लेखी पत्र देण्याचा आग्रह केला. त्यानुसार नायब तहसीलदारांनी स्टॉलधारकांच्या मागणीसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे पत्र दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी नगरसेविका अक्षता जैतापकर, मीनाताई बोडके, बंडू सावंत, प्रा. संजीवनी पाटील, विद्या पाटील, भालचंद्र जाधव आदी उपस्थित होते.

चौकट
आंदोलन पुढेही सुरूच ठेवणार
भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विनायक वावरे यांनी उपोषण स्थगित करण्यासाठी मध्यस्थी केली. आज दुपारी नायब तहसीलदार यमगर यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी उपोषणस्थळी स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांच्या एकजुटीचे देखील त्यांनी कौतुक केले. कुठलीही अडचण येणार नाही याबाबतची खबरदारी घेण्याची ग्वाही त्यांनी उपोषणकर्त्यांना दिली. दरम्यान, संपामुळे आम्ही उपोषण स्थगित करीत असलो तरी जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करीत राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT