कोकण

डेली एक्स्प्रेस यापुढेही बंदच

CD

88976
विनायक राऊत

ठाकरे गटातर्फे आज
निष्ठावंतांचा सत्कार
कुडाळ ः उद्धव ठाकरे गटाचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. १५) शरद कृषी भवन, ओरोस येथे सायंकाळी ३ ते ५ या वेळेत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६९ कट्टर, निष्ठावंत, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार राऊत यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
डेली एक्स्प्रेस
यापुढेही बंदच
कणकवली ः कोकण रेल्वेमार्गावर धावणारी व मागील अनेक महिने बंद असणारी रत्नागिरी-मडगाव- रत्नागिरी डेली एक्स्प्रेस आता यापुढेही बंदच राहणार आहे. कोकण रेल्वेतर्फे ९ डिसेंबर २०२२ ला प्रसिद्धी पत्रक देण्यात आले. त्यानुसार ही गाडी ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे म्हटले होते; मात्र आता ही गाडी यापुढेही बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. गाडीची सेवा नक्की कधी सुरू केली जाणार, हे सांगितलेले नाही. रत्नागिरी आणि मडगाव विभागातील सुरक्षा विषयक देखभालीचे कारण देऊन ही गाडी अनेक महिने बंद आहे.
---
मालवणात २२ ला
डबलबारी सामना
मालवण ः महावितरण कंपनीच्या मालवण, देऊळवाडा उपविभाग कार्यालयातील कर्मचारी वृंदातर्फे २२ मार्चला वीज कार्यालयात धार्मिक कार्यक्रमांनिमित्त डबलबारीचे आयोजन केले आहे. सामना महादेश्वर भजन मंडळ, देवगड नाडणचे बुवा संदीप पुजारे (पखवाज-मंजिल काळसेकर, तबला-सिद्धेश काळसेकर) व सोमजाई देवी भजन मंडळ, ठाणे दिवाचे बुवा संतोष शितकर (पखवाज-हेमंत तवटे, तबला-गौरव पिंगुळकर) यांच्यात होणार आहे.
---------------
माकडाच्या हल्ल्यात
शिरोड्यात तिघे जखमी
वेंगुर्ले ः शिरोडा गावातील वाटसरूवर माकडाने जीवघेणा हल्ला केला. माकडाने केलेल्या हल्ल्यात शिरोडा-खाजणभाटी भागातील अमरे कुटुंबातील लहान मुलांसह तिघेजण जखमी झाले आहेत. या उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खाजणभाटी भागातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे शिरोडा ग्रामपंचायतीकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT