कोकण

हडपीडला साडेतीन शक्तिपीठ दर्शन सोहळा

CD

89846
हडपीड ः श्री स्वामी समर्थ मठ

हडपीडला साडेतीन शक्तिपीठ दर्शन सोहळा

बुधवारपासून विविध कार्यक्रम; स्वामी समर्थ भक्त परिवाराचा उपक्रम

मुणगे, ता. १८ ः हडपीड (ता. देवगड) येथील स्वामी समर्थ मठाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे दोन दिवसांचे अधिष्ठान हडपीड येथील स्वामी समर्थ मठामध्ये २२ ते २४ मार्च या कालावधीत आयोजित केले आहे. साडेतीन शक्तिपीठ दर्शन सोहळा तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चांदीच्या नूतन चरणपादुंकाची प्रतिष्ठापना प.प. जगतगुरू शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
हडपीड येथे स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी-मुंबई संचलित स्वामी समर्थ मठ येथे साडेतीन शक्तिपीठांचे दोन दिवसांचे अधिष्ठान शक्तिपीठ दर्शन सोहळा होणार आहे. बुधवारी (ता. २२) सायंकाळी चारला पालखी सोहळ्यास प्रारंभ होणार असून देवी पावणादेवी मंदिर शिरगाव, निमतवाडी हडपीड पावणाई मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत काढण्यात येईल. रात्री आठला महाराष्ट्राच्या साडेतीन देवी शक्तिपीठांचे स्वामी समर्थ मठात आगमन, गोंधळ, गुरुवारी (ता. २३) सकाळी पाचला गणेश पूजन, पादुका पूजन, सातला ‘श्रीं’ची महापूजा, सकाळी नऊला प. प. जगतगुरू शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना, साडेतीन शक्तिपीठांच्या सात्विक महादेवींची दोन दिवसीय स्थापना, दहाला लघुरुद्र, दुपारी बाराला पालखी सोहळा, साडेबाराला महाआरती, दीडला महाप्रसाद, तीनला प्रशांत पाटोदेकर यांचा गीत गायनाचा कार्यक्रम, सायंकाळी सहाला देवींचा आविष्कार (सखी परिवार, कोकणकट्टा), रात्री आठला ‘महाराष्ट्राची लोकधारा’ (इंद्रायणी ग्रुप, सावंतवाडी), शुक्रवारी (ता. २४) सकाळी दहाला कुंकूमार्चन, दुपारी बाराला महाआरती, एकला महाप्रसाद, तीनला प्रा. डॉ. यशवंतराव पाटील (नाशिक) यांचे व्याख्यान, सायंकाळी पाचला नामस्मरण, सहाला गोंधळ आणि इतर कार्यक्रम तसेच देवी भक्तीचा सुवर्णोत्सव तुळजापूरची देवी भवानी माता, वणी-नाशिकची देवी सप्तशृंगी माता, कोल्हापूरची देवी महालक्ष्मी माता आणि म्हाहूर-नांदेडची देवी रेणुका माता या शक्तिपीठांचे सत्वाचे दर्शन घेता येणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाकर राणे, नंदकुमार पेडणेकर, ज्ञानेश्वर राऊत, नितीन म्हापसेकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT