कोकण

इनरव्हील क्लबतर्फे सावंतवाडीत गरजू, दिव्यांगांना साहित्य वाटप

CD

९००७०

इनरव्हील क्लबतर्फे
दिव्यांगांना साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने २३ दिव्यांगांसह गरजूंना जयपूर फूट, हात, सर्जिकल शूज, स्टीक, व्हीलचेअर आणि वॉकरचे मोफत वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, वैभववाडी, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड तालुक्यांसह गोव्यातील गरजू व दिव्यांगांनी याचा लाभ घेतला.
यावेळी इन्हरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, उपाध्यक्षा डॉ. शुभदा करमरकर, आयएसओ देवता हावळ, वैभवी शेवडे, सुहासिनी तळेगावकर आदी होत्या. यावेळी दिव्यांगांसह सर्व गरजूंनी इनरव्हील क्लबच्या या उफक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. इनरव्हीलच्या अध्यक्षा रासम यांनी अशा शिबिरांतून अपघातापेक्षा डायबिटीसमुळे अनेक जणांना पाय गमवावे लागतात, हे वास्तव पुन्हा एकदा समोर असल्यामुळे यासाठी काळजी घेण्याच्या दृष्टीने लवकरच इनरव्हील क्लबतर्फे ''डायबिटीस अवेअरनेस'' शिबिर घेण्याचे यावेळी जाहीर केले. गेल्या ४० वर्षांपासून या क्लबच्यावतीने सावंतवाडी शहर व तालुका परिसरात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आदी विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. यापूर्वीही २०१८ मध्ये अशाच प्रकारे दिव्यांगांसाठी खास शिबिराचे आयोजन करून ३२ जणांना दिव्यांगांना मोफत जयपूर फूटचे वितरण करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT