कोकण

बंद बस फेऱ्या पूर्ववतची मागणी

CD

बंद बस फेऱ्या
पूर्ववतची मागणी
कुडाळ ः कोरोना कालावधीत बंद केलेल्या कणकवली व मालवण बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. पांग्रड-कणकवली व पांग्रड-मालवण अशा दोन एसटी बसेस अनेक वर्षे कडावल भागातून थेट सुरू होत्या. त्यामुळे ओरोस जिल्हा मुख्यालय, कसाल, वागदे, कणकवली तसेच मालवणकडे जातात. ओरोस, सुकळवाड, कट्टा, चौके भागात जाणाऱ्या प्रवाशांना टप्प्याटप्प्याने न जाता थेट सेवा मिळत असल्याने प्रवासी समाधानी होते. शासनाने महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत जाहीर केली असून त्याचा फायदा घेता येत नाही. उन्हाळी सुटी, विवाह समारंभ सुरू होत असून मुंबईकर चाकरमान्यांची गर्दी वाढणार असल्याने कणकवली व मालवण या बसेस तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी निरुखे सरपंचांनी विभाग नियंत्रकांकडे केली आहे.
----------------
सातार्डात क्रिकेट
स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी ः सातार्डा-रायाचेपेड येथील आर. आर. बॉयज स्पोर्ट क्लबच्यावतीने आर. आर. चॅम्पियन ट्रॉफी २०२३ एक गाव एक संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २५ व २६ मार्चला आरटीएमच्या मैदानात केले आहे. विजेत्या संघाला १२ हजार रुपये व चषक, उपविजेत्याला आठ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या १६ संघांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुक संघांनी मंडळाचे कार्यकर्ते संगम आरोंदेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
कणकवली-नेहरूनगर
रस्ताकामास प्रारंभ
कणकवली ः शहरातील महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा प्रारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते झाला. शहरातील अनेक रस्त्यांची डांबरीकरण कामांना मंजुरी मिळाली आहे. काही कामे पूर्ण झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. नगरपंचायतच्या माध्यमातून आमदार नीतेश राणे यांनी या कामांकरिता निधी दिला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगरमधील या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालांडकर, राजन परब, संजय ठाकूर, मनोज हिर्लेकर, कल्याण पारकर आदी उपस्थित होते.
--------------------
परुळेत शेतकरी
मार्गदर्शन शिबिर
वेंगुर्ले ः श्री देव आदिनारायण विकास सेवा सोसायटी लि., परुळे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दुधाळ जनावरे पालन, दूध संकलन, कर्जपुरवठा करणे यासाठी मार्गदर्शन शिबिर २७ मार्चला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत परुळेबाजार ग्रामपंचायत सभागृहात होणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी परुळे सोसायटीचे चेअरमन नीलेश सामंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
मालवणात शुक्रवारी
विविध कार्यक्रम
मालवण ः सर्जेकोट-पिरावाडी येथे २४ मार्चला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सातला मच्छीमार बांधवांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, श्रींची महापूजा, ७ ते ९ संगीत भजन, रात्री साडेदहाला संत बाळूमामा कलामंच, मालवण यांचा ‘नवतरंग’ हा कार्यक्रम होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT