कोकण

अडीच वर्षांत काय केले?; मनसेचा प्रश्न

CD

90275
आशिष सुभेदार

अडीच वर्षांत काय
केले?; मनसेचा प्रश्न

ठाकरे युवासेनेवर टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः ठाकरे युवासेनाला डी.एड् धारकांसाठी आंदोलन करावे लागले, ही शोकांतिका असून अडीच वर्षे महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असताना व शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हा प्रश्न कळकळीने का सोडविला नाही, असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर यांनी युवासेनेच्या आजच्या आंदोलनावर उपस्थित केला.
सुभेदार यांनी यासंदर्भात पत्रकार प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले; मात्र स्वतःचे सरकार अडीच वर्षे सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डी.एड् भरतीचा प्रश्न कळकळीने का सोडवला नाही? आता त्यांना डी.एड् धारकांचा एवढा पुळका का आला? केवळ दिखाव्यासाठी हे आंदोलन असून डी.एड् धारकांच्या मनसे सदैव पाठीशी आहे. लवकरच याबाबत विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेऊन डी.एड् पदवीधरांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मंत्री केसरकर हे ठाकरे सेनेला सोडून शिंदे सेनेमध्ये गेल्याने गटातटाच्या राजकारणातून आजचे हे आंदोलन होते. त्यामागे डी.एड् धारकांचा प्रश्न सोडवण्याचा कुठलाही हेतू नव्हता. मंत्री केसरकर हे सुद्धा युती सरकारच्या काळात पालकमंत्री होते केसरकर. त्यावेळी हा प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेकडून वारंवार आंदोलने करून आवाज उठवण्यात आला. त्यामुळे ठाकरे युवासेनेचे आजचे आंदोलन हे एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT