कोकण

पावणाई-नेटकेश्वर बहीणभावाची भेट शिमग्यात

CD

( पान २ साठी)


-rat२०p१.jpg-
९०१९९
सावर्डे ः आगवे गावातून पावणाईची पालखी आणताना ग्रामस्थ, तर दुसऱ्या छायाचित्रात मांडकी नेटकेशवर साहनेवर बसलेल्या दोन्ही पालख्या.
--
पावणाई-नेटकेश्वर बहीणभावाची भेट शिमग्यात

शिमगोत्सव उत्साहात ; भाविकांमध्ये आनंद

सावर्डे, ता. २० : चिपळूण तालुक्यातील मांडकी श्री देव नेटकेश्वर व आगवे येथील पावणाई देवी ही दोन गावातील ग्रामदैवत म्हणजे भाऊ बहीण मानले जातात. ही भावंडे शिमगा सणात एक वर्ष आड होळी पौर्णिमेनंतर मांडकी सहानेवर एकत्र आले. या दोघांची भेट म्हणजे येथील शिमगा उत्सवातील परंपरा फार पूर्वी काळा पासून चालत आली असून अत्यंत श्रद्धेने दोन गावच्या ग्रामस्थांच्या सलोख्याने आनंदाने शिमगोत्सव साजरा झाला.
श्री देव नेटकेश्वर मांडकी व आई पावणाई आगवे हे दोघ भाऊ बहीणीची अनोखी भेट आणि परंपरा व शिमगा दोन्ही गावच्या ग्रामस्थांसाठी पर्वणीच असते. यामुळे दोन गावचे संबंध अतूट बनले आहेत. दोन्ही गावात आपआपल्या ग्रामदैवतेच्या पालख्या श्रुंगारून साहानेवर आणण्यात आल्या. मांडकीवासीय ग्रामस्थ आगवे गावी आई पावणाई देवीची पालखी माहेरवाशीणीला आणायला माघारी गेले. ढोल-ताशांच्या तालावर नाचवत पालखी मांडकी गावात सहानेवर घेऊन आले. सोबत आगवे गावातील ग्रामस्थचे प्रमुख मंडळी आई पावणाईला सोडायला आली होती.
मांडकी गावच्या सहानेवर श्री देव नेटकेश्वरच्या पालखीशेजारी बाजूला बहीण पावणाईची पालखी बसली. एक दिवसाच्या सहानेवरील सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही पालख्या संपूर्ण मांडकी गावात घरोघरी गेल्या. आगवे गावची पालखी मांडकीमधे एक वर्ष आड करुन येते व सर्व घरात दोन्ही पालख्या फिरवल्या जातात. मांडकी सहानेवर सत्यनारायण पूजा करून आगवे गावच्या ग्रामदैवतेला निरोप देण्यात आला. आगवेवासीय पावणाई देवीला पुन्हा आगवे गावी नेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT