कोकण

मंडणगड-रिपाइंचे वतीने मंडणगड ते महाड बाईक रॅली

CD

फोटो ओळी
-rat२०p२५.jpg- KOP२३L९०३४२ मंडणगड : मंडणगड येथून महाड येथे जाणाऱ्या बाईक रॅलीचा शुभारंभ करताना दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, जिल्हा युवक सरचिटणीस आदेश मर्चंडे व रिपाईचे कार्यकर्ते.
----------

रिपाइंची मंडणगड ते महाड बाईक रॅली

चवदार तळे सत्याग्रहाचे स्मरण ; ९६ वर्षे पूर्ण
मंडणगड, ता. २१ ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मंडणगड तालुका शाखेतर्फे चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मंडणगड ते महाड बाईक रॅली काढण्यात आली. रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे व दलितमित्र दादासाहेब मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली युवक रॅलीत सहभागी झाले. दुपारी चार वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारातून बाईक रॅली महाड चवदार तळे या ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ झाली.
महाड येथे जावून सर्व कार्यकर्ते चवदार तळ्यास भेट देऊन डॉ. बाबासाहेबांचे व त्यांनी दलित समाजासाठी या लढ्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या आंदोलनानिमित्ताने स्मरण करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ ला महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्या घटनेस यंदा ९६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रॅली काढण्यात आली.
बाईक रॅलीत रिपाइंचे तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, विजय खैरे, सुनील तांबे, संकेत तांबे, संदीप येलवे, विधान पवार, मुराद तांडेल, सुशांत खैरे, गौरव मर्चंडे, संकेश कासारे, नीलेश मर्चंडे, सुमित साळवी आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT