कोकण

जनरेटर नेणाऱ्या टेम्पोला नांदगावमध्ये अपघात

CD

90346
नांदगाव ः अपघातग्रस्त टेम्पो.

जनरेटर नेणाऱ्या टेम्पोला
नांदगावमध्ये अपघात
नांदगाव, ता. २० ः मुंबई-गोवा महामार्गावर मालवणहून इचलकरंजी येथे जनरेटर वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. हा अपघात येथील कोळंबा मंदिरनजीक कृपासिंधू कॉम्प्लेक्स जवळ आज दुपारी पावणे एकच्या दरम्यान झाला. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. गुरे आडवी आल्याने अपघात झाल्याचे टेम्पो चालकाने सांगितले.
मालवण येथे काल झालेल्या भगवा चषक क्रिकेट स्पर्धेसाठी जनरेटर वाहने दाखल होती. ही स्पर्धा काल संपल्यानंतर इचलकरंजी येथील डेकोरेटर आपले जनरेटर वाहन व सोबत असलेली जनरेटर ट्रॉली घेऊन इचलकरंजीच्या दिशेने जात होता. नांदगाव येथे अचानक महामार्गावर गुरे आडवी आल्याने वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडला. यात टेम्पोतील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही; मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो महामार्गावरून बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी महामार्ग पोलिस प्रकाश गवस, संदेश आबिटकर, दिलीप पाटील, दत्तात्रय कांबळे, सुमित चव्हाण, सुधीर घारकर, होमगार्ड नरसाळे, पाटील आदींसह उपस्थित होते. अपघातामुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमधून एकेरी वाहतूक सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT