Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

येथील महात्मा फुलेनगर वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. आज सकाळी पावने सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचा प्राथमिक अदांज अग्नीशामक दलाने व्यक्त केला आहे.
Hadapsar
Hadapsar sakal

हडपसर : येथील महात्मा फुलेनगर वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. आज सकाळी पावने सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याचा प्राथमिक अदांज अग्नीशामक दलाने व्यक्त केला आहे.

येथील झोपडपट्टीत आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार हडपसर, बी. टी. कवडे, काळे बोराटेनगर फायर स्टेशन दलातील फायर गाड्या घटना स्थळी पोहचल्या. घटना स्थळी झोपड्यांपर्यंत जाण्यास कोणताही मार्ग नसल्याने शिडीच्या साह्याने ब्रिज वरून खाली उतरून आगीवर जेट व स्प्रे पद्धतीने पाण्याचा मारा सुरु करण्यात आला. तसेच, फायर गाडीच्या पंपापासून होजच्या दोन रांगा तयार करून आगीवर सतत पाण्याचा मारा चालू ठेवून संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात आली.

Hadapsar
Pune News : पानशेत नदीपात्रात गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या पुण्यातील मजूर तरुणाचा बुडून मृत्यू

आगीमध्ये रेहाना आसिफ शेख, सलीम मुबारक शेख, कल्लू मुबारक शेख व चांद मुबारक शेख यांच्या झोपड्यांमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य जळून खाक झाले. आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे स्टेशन ड्यूटी अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com