कोकण

रंगाची उधळण अन् डीजेवर ठेका

CD

90524
कणकवली : शहरात ठिकठिकाणी रंगपंचमी निमित्त तरूणाईने रंगांची उधळण केली. (छायाचित्र : अनिकेत उचले)


रंगाची उधळण अन् डीजेवर ठेका

कणकवलीतील रंगपंचमीत तरुणाई बेधुंद, महिलांसह चिमुकल्यांचाही सहभाग

कणकवली, ता.२१ : येथील शहरात आज विविध रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्‍सव साजरा करण्यात आला. यात बाजारपेठ ढालकाठी आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर आॅर्केस्ट्रा, डीजेच्या तालावर तरूणाई बेधुंदपणे थिरकली. शहरात महिला, युवतींसह बच्चे कंपनीही रंगपंचमीमध्ये न्हाऊन निघाली.
रंगपंचमी उत्‍सवानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून विविध रंग, पाणी आणि म्‍युझिक व्यवस्था मोफत उपलब्‍ध करून देण्यात आली होती. शहरातील बाजारपेठ ढालकाठी मित्रमंडळानेही रंगोत्‍सवाचे आयोजन केले होते. तर महापुरूष मंदिर नजीक महापुरूष मित्रमंडळाचा रंगोत्‍सव कार्यक्रम झाला. यात रत्‍नागिरी येथील कलावंतांनी ऑर्केस्ट्रा सादर केला. येथील रंगपंचमी उत्‍सवात बाजारपेठेतील अबालवृद्ध मंडळींनी सहभाग घेऊन रंगांची उधळण केली. या ठिकाणी रेन शॉवरचीही उपलब्‍धता करण्यात आली होती.
---
या ठिकाणीची उत्साह
शहरातील पटकीदेवी मित्रमंडळ, बांधकरवाडी, पिळणकरवाडी, कनकनगर, तेलीआळी, हर्णेआळी, वरचवाडी, परबवाडी, नाथ पै नगर, या ठिकाणी देखील रंगांची उधळण करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT