कोकण

गोठ्याच्या बांधकामाचे गोळवणमध्ये भूमिपूजन

CD

90620
गोळवण ः येथे गोठा बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन बाबू वरक यांच्या हस्ते करण्यात आले.

गोठ्याच्या बांधकामाचे
गोळवणमध्ये भूमिपूजन
मालवण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोळवण येथील प्रगतशील शेतकरी बाबू वरक यांच्या शेतात गोठा बांधणे कामाचे भूमिपूजन बाबू वरक व सुनंदा वरक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच सुभाष लाड, उपसरपंच साबाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले, ग्रामस्थ जानू वरक, पांडू वरक, स्नेहा वरक, लक्ष्मी वरक, जनाबाई वरक, भाई चिरमुले, सुहास घाडी, संदेश पवार, ग्रामरोजगार सेवक रामकृष्ण नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी बाळाराम परब, करुणा राणे उपस्थित होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून बाळकृष्ण जाधव (कुमामे), मनोज चव्हाण (कुमामे), प्रभानंद पवार (गोळवण), संभाजी गावडे (गोळवण) यांचेही गोठा बांधणे कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या लाभार्थ्यांना गोठा बांधण्यासाठी ७७ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती सरपंच लाड यांनी दिली.
................
90621
शिवन्या पचकर, रिया आग्रे

लोरे मोगरवाडी शाळेचे यश
तळेरे ः अक्षरोत्सव परिवार व श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन तळेरेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये लोरे-मोगरवाडी (ता. वैभववाडी) शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविले. गट क्रमांक एकमध्ये (पहिली ते चौथी) शिवन्या पचकर (पहिली) हिने द्वितीय, तर रिया आग्रे (तिसरी) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सुकन्या नराम हिने उत्तेजनार्थ यश प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना शिक्षक युवराज पचकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख गौतम तांबे, मुख्याध्यापक किशोर पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT