कोकण

भाजप आमदारांच्या विरोधात सावंतवाडीत काँग्रेसच्या घोषणा

CD

91105
सावंतवाडी ः येथे केंद्राच्या विरोधात आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी.

भाजप आमदारांच्या विरोधात
सावंतवाडीत काँग्रेसच्या घोषणा

केंद्रावर टीका; दबावाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात दोषी ठरविल्यानंतर भाजप आमदारांकडून विधान भवनासमोर छेडलेल्या आंदोलनाचा सावंतवाडीत काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गांधी यांच्या प्रतिमेवर जोडे मारणाऱ्या आमदारांचा उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. हा सर्व प्रकार म्हणजे काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी केंद्राने रचलेले षड्‍यंत्र आहे; मात्र त्यांचा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर यांनी दिला. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी रवींद्र म्हापसेकर, संजय लाड, आनंद परुळेकर, अशोक राऊळ, सुधीर मल्हार, तौकीर शेख, चंद्रकांत राणे, संतोष सावंत, समीर भाट, अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, उल्का सांगेलकर, माया चिटणीस, तौकीर शेख, आनंद कुंभार, राज पेडणेकर, विभावरी सुकी आदी उपस्थित होते.
अॅड. नार्वेकर पुढे म्हणाले, ‘‘विरोधी नेत्याची भूमिका बजावत असताना राहुल गांधी केंद्रावर टीकास्त्रे सोडत आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी भाजपने आता प्रयत्न सुरू केले आहेत. सवयीप्रमाणे आपल्या विरोधात कोणी बोलू लागला की त्याच्यामागे एक तर ‘ईडी’ लावायची किंवा कुठच्या तरी खोट्या गुन्ह्याखाली न्यायालयात खेचायचे, हा त्यांचा आता दिनक्रमच ठरला आहे; मात्र असे प्रकार करून जर कोणी काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही खपवून घेणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला त्यांचा खोटा चेहरा दाखवून देऊ.’’
--
जनताच जागा दाखवेल
सौ. सुकी म्हणाल्या, ‘‘विधानभवनासमोर भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून केलेले आंदोलन निंदनीय आहे. भाजपची कोणीही सत्य बाजू दाखवली की त्याच्या विरोधात जाण्यासाठी त्यांना ईडी किंवा न्यायालयाचा आधार घ्यावा लागतो, हे जनतेलाही कळले आहे. त्यामुळे येत्या काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. आमच्या नेत्यांवर खोटे आरोप किंवा गुन्हे दाखल करून काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही शांत बसणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT