कोकण

कुडाळात १३ एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा

CD

कुडाळात १३ एप्रिलला वक्तृत्व स्पर्धा
कुडाळ ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जयभीम युवक मंडळातर्फे (कै.) वसंत जाधव जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा १३ एप्रिलला सायंकाळी सहाला आंबेडकरनगर येथे आयोजित केली आहे. गट क्रमांक १ लहान गटासाठी (पाचवी ते दहावी) ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘वडील रामजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण’, ‘माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, असे विषय असून १५००, १०००, ५०० रुपये व सर्वांना प्रशस्तीपत्र, गट क्र. २ साठी (खुला गट) ‘सत्याग्रही डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज’, ‘अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, असे विषय असून ३०००, २०००, १००० रुपये व चतुर्थ, पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार आहे. सात मिनिटांची वेळ आहे. अंकिता तेंडोलकर यांच्याकडे १२ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन विद्याधर कुडाळकर यांनी केले आहे.
--
अनुदानधारकांना शासनाचे आवाहन
सावंतवाडी ः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत संजय गांधी, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांचे ज्या बँकेत अनुदान सुरू आहे, अशा बँक मॅनेजरकडे स्वत: हजर राहून ते हयात असल्याची नोंद बॅंक व्यवस्थापकांनी घ्यायची आहे. तालुक्यातील एकूण २ हजार ९५८ लाभार्थ्यांचे हयात दाखले संबंधित बँकांमध्ये पाठविले असून त्यावर १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत लाभार्थ्यांनी व्यवस्थापनाकडे स्वतः उपस्थित राहून हयात असल्याबाबत नोंद द्यायची आहे, असे आवाहन तहसीलदार, संजय गांधी योजना, पेन्शन विभाग यांच्यामार्फत केले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाबाबतचा दाखला तहसील कार्यालयाला याच कालावधीपर्यंत पाठवून द्यायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT