कोकण

नाईक यांच्याकडून लोकाभिमुख उपक्रम

CD

91269
वालावल हुमरमळा : वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुमरमळा (वालावल) येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्‍घाटन करताना संजय पडते, अतुल बंगे आदी.

नाईक यांच्याकडून लोकाभिमुख उपक्रम

अतुल बंगे; कुडाळ येथे वाढदिवस उपक्रमांनी

कुडाळ, ता. २५ : आरोग्य तपासणी, रक्तदान,नेत्र तपासणी, सामाजिक उपक्रम हे आमदार वैभव नाईक यांचे लोकाभिमुख उपक्रम असुन जे लोकांना आवश्यक आहे तेच देण्याचे काम ते करतात, असे गौरवोद्गार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी काढले.
आमदार नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हुमरमळा (वालावल)येथे नेत्र तपासणी शिबीराचे दीपप्रज्वलन करून श्री पडते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री पडते म्हणाले, ‘‘नाईक यांचा वाढदिवस कार्यकर्ते साजरा करतात. यानिमित्त आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा केला जातो. हाच खरा आपल्या नेतृत्वाचा अभिमान असुन सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. येणारी २०२४ची निवडणूक जिंकुन राज्याचे कॅबिनेट मंत्री ते असतील.’’
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी राजेंद्र केळकर, डॉ. तेली, अतुल बंगे, कुडाळ शिवसेना ओबीसी सेल शहर प्रमुख राजु गवंडे, कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, सरपंच सौ अर्चना बंगे, ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्य अमृत देसाई, माजी सरपंच प्रवीण मार्गी, शिवसेनेचे श्री.प्रसाद, समर्थ नगर स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे सतिश मांजरेकर, भाऊ गुंजकर, नारायण राणे, अमित बंगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT