कोकण

आदित्य भट यांच्या कॅमेऱ्याने टिपली आकाशगंगा

CD

- rat२८p१०.jpg ः
९१८६७
पावस ः कुर्धे येथील आदित्य भट यांनी आकाशगंगेचे आपल्या मोबाईलमध्ये टिपलेले छायाचित्र.
---
आदित्य भट यांच्या कॅमेऱ्याने टिपली आकाशगंगा

पहिल्याच प्रयत्नात यश ; आकाश निरभ्र असल्याने झाले शक्य

पावस, ता. २८ ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील विक्रमवीर आदित्य भट यांच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या एका क्लिकने मोबाईलमध्ये आकाशगंगा सामावली. अवकाशाबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असते; पण हे कुतूहल हौस आणि इच्छा याच्या जोडीने असेल तर अनोखी गोष्ट होते. अशीच एक अनोखी गोष्ट भट यांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून केली आहे.
भट यांनी अवकाशातील आकाशगंगा चक्क आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, खूप दिवसांपासून मिल्कीवेचा अर्थात आकाशगंगेचा फोटो काढायचं डोक्यात होते; सोमवारी पहाटे योग जुळून आला. पहाटे जवळपास साडेचार वाजता आकाशसुद्धा स्वच्छ होते आणि आकाशगंगादेखील डोळ्यांना जाणवेल इतपत धुसर ढगांच्या पट्ट्यासारखी उत्तर-दक्षिण पसरलेली दिसत होती. मग कोणताही वेळ न वाया घालवता माझा मोबाईल घेतला आणि त्यातील पीआरओ मोडमध्ये जाऊन सेटिंग लावून ३० सेकंदांसाठी मोबाईल ट्रायपॉडला लावून अंगणात ठेवला आणि रिझल्ट पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नात एक सुंदर फोटो मिळाला, असे त्यांनी सांगितले. आदित्य हे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कला शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांना छायाचित्रे घेण्याची विशेष आवड आहे. त्यांनी जागतिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये मायक्रो कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या फेसबुक पेजवर अनोख्या इमेज पाहता येतात. त्यांनी चक्क अवकाशातील आकाशगंगेलाच आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT