कोकण

रंगभूमी दिनी सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांची मांदियाळी

CD

- rat२८p१५.jpg ः
९१८८३
रत्नागिरी ः जागतिक रंगभूमी दिनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.
- rat२८p१६.jpg ः
९१८८४
जागतिक रंगभूमी दिनात श्री साईबाबांच्या व्यक्तीरेखेने रंगत आणली.
(छाया ः जॉनी आपकरे, रत्नागिरी)
-
रंगभूमी दिनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी

अखिल भारतीय नाट्य परिषद ः श्री साईबाबांच्या व्यक्तीरेखेचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात नटराजच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर बेहेरे, सुहास भोळे, सुहास साळवी, मनोहर जोशी, विनयराज उपरकर, विनोद उर्फ अण्णा वायंगणकार, नितीन जोशी, नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर आदी उपस्थित होते.
राकेश बेर्डे यांच्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर किरण डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सोलो आणि ग्रुप डान्स करून रंगत वाढवली. यासिन नेवरेकर, विनायक नागवेकर, सागर निंबाळकर, नरेश पांचाळ यांनी करोओके गीतांनी त्यात रंग भरला. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर बेहेरे यांचा सत्कार करण्यात आला. मनोगतात बेहेरे यांनी त्यांचा प्रवास उलगडला तसेच आपल्या कार्याची नोंद घेतल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. बालकलाकार सुमुख काळेच्या कार्यक्रमात रंगत वाढली तर कवितके या छोट्याशा गायिकेनेदेखील गीत सादर केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते संगीत सह्याद्री ग्रुप लांजा यांचे श्री साईबाबा. रंगमंचावर साईबाबा अवतारल्यामुळे नाट्यगृहातील वातावरण भक्तिमय झाले. सामाजिक कार्यकर्ते विनायक खानविलकर यांनी साईबांबाची व्यक्तीरेखा साकारली होती. रंगभूषा रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगभूषाकार नरेश पांचाळ यांनी केली होती. साईबाबांच्या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.

कलाकारांचा सन्मान...
या प्रसंगी राज्य नाट्यस्पर्धेत यश प्राप्त केलेल्या रत्नागिरीतील रंगकर्मींचा सन्मान करण्यात आला. सांघिक विजेतेपद नाटक, प्राथमिक फेरीतील विजेते, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील विजेते, परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे - संगीत नाट्यस्पर्धेतील नाटक संगीत मंदारमाला आणि त्यातील यशस्वी कलाकार व अन्य, संगीत नाट्यस्पर्धेतील कालारंग नाट्य प्रतिष्ठान वरवडे-खंडाळ्याचे उपविजेते नाटक संगीत मल्लिकामधील सर्व टीमचा तसेच मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलचे ''राखेतून उडाला मोर'' या बालनाट्य स्पर्धेतील यशस्वी तर वैयक्तिक बक्षिसपात्र कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT