कोकण

घटनांकडे संविधानात्मक दृष्टीने पाहा

CD

91896
मालवण ः सेवांगण येथे आयोजित संविधान संवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

घटनांकडे संविधानात्मक दृष्टीने पाहा

राजवैभव रामचंद्र; मालवण सेवांगणमध्ये कार्यशाळेस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : देशात एखादी घटना घडल्यानंतर आपण विशिष्ट विचाराच्या चष्म्यातून त्या घटनेकडे बघतो. त्या घटनेला त्याच विचारात बांधतो; परंतु आता हे बदलण्याची गरज आहे. समाजात घडलेल्या घटनांना संविधानाच्या दृष्टीकोनातून बघायला हवे. त्यामुळे संविधानाने आपल्याला काय दिले, हे समजेल. संविधान सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्यास नागरिक ते समजावून घेतील. संविधान समजावून देण्यासाठी समाजातील नागरिकांशी संवाद साधूया, असे आवाहन लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी येथे केले.
बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत, फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे ‘संविधान समजून घेण्यासाठी संविधान संवाद’, या एकदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष आनंद मालवणकर, सचिव संजय जाधव, अमोल पाटील, स्नेहल माळी, संग्राम कासले, संजय आचरेकर, संजय वराडकर आदी उपस्थित होते.
अॅड. परुळेकर म्हणाले, ‘‘भारतीय संविधान व त्यामधील तरतुदी या देशातील नागरिकांना समजावून सांगणे गरजेचे आहे; परंतु संविधानातील तरतुदी जशाच्या तशा सांगितल्या गेल्या, त्या नागरिकांना समजणे कठीण आहे. त्यामुळे त्या सोप्या शब्दांत सांगणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे संविधान संवाद व त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने संविधान समजावून सांगत आहे. संविधान संवादाचे हे कार्यक्रम शाळा, महाविद्यालय या ठिकाणी होणे आवश्यक आहे.’’
संविधान कार्यशाळेमध्ये राजवैभव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना विविध उपक्रम दिले. त्याचबरोबर संविधानाशी संबंधित स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पुस्तक रुपाने पारितोषिके देण्यात आली. गट चर्चेद्वारे संविधान सभेची माहिती देण्यात आली. यावेळी रंजन तांबे, दर्शना गुळवे, विजय चौकेकर, व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचे विद्यार्थी अर्जुन गावडे, बाजीराव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बॅ. नाथ पै सेवांगणच्या कर्मचारी वृंदाने सहकार्य केले. संजय आचरेकर यांनी सूत्रसंचालन केले. संग्राम कासले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT