कोकण

खेड ः खेड येथे काँग्रेस आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

CD

फोटो ओळी
-rat28p38.jpg ः KOP23L91979 खेड ः मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करताना काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
-rat28p39.jpg ःKOP23L91980 तालुकाध्यक्ष गौस खतिब व काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
---------

महामार्ग रोखणारे काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात

खेडमध्ये भरणेनाका येथे आंदोलन ; पोलिसांनी ताब्यात घेतले
खेड, ता. २८ः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या निषेधार्थ आज खेड येथील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन छेडले. सकाळी साडेअकराच्या सुमारास भरणेनाका येथे महामार्गानजीक खेड काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
राज्यभरासह देशभरामध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षाची गळचेपी सुरू आहे. सीबीआय, ईडीसारख्या विविध संस्थांचा कशा पद्धतीने गैरवापर सुरू आहे. आपण आता एकसंघ होणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे झेंडे हाती घेऊन मुंबई-गोवा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्ते खेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतिब व काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या वेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा जाहीर निषेधदेखील व्यक्त केला. आंदोलनामध्ये माजी नगरसेवक बशीर मुजावर, जिल्हा सरचिटणीस मधुकर शिंगे, मुरलीधर बुरटे, महामूद पालेकर, भाऊ मोहिते, खेड-दापोली-मंडणगड येथील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT