कोकण

आंगणेवाडी भराडी देवी मंदिरास पालकमंत्री रविंद्र चव्हाणांची भेट

CD

92265
आंगणेवाडी ः श्री देवी भराडी मंदिर येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करताना मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे आणि सोबत काका आगणे, बाबू आंगणे, अनंत आंगणे, बाब्या आंगणे आणि मान्यवर.


आंगणेवाडी येथील मंदिरास
पालकमंत्री चव्हाणांची भेट
मसुरे, ता. २९ : दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन श्रीदेवी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी येथील विविध विकास कामे पालकमंत्री चव्हाण यांनी मंजूर करून आंगणेवाडीच्या विकासात मोलाचा हातभार लावला आहे. आंगणेवाडी यात्रा उत्सव काळात पालकमंत्री चव्हाण यांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली. शिवाय होऊ घातलेली विकासकामेही तातडीने होण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत आंगणे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित विकासकामांबरोबर ग्रामस्थांनी पालकमंत्री चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नवीन तीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या; परंतु पूर्वीच्या मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतचे नाव बदलून मर्डे ग्रामपंचायत झाले. याबाबत प्रशासनाच्या चुकीमुळे कोणतीही मागणी नसताना प्रशासनाने या ग्रामपंचायतीचे मर्डे असे नामकरण केले. याबाबत मसुरे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मसुरे ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उद्योजक डॉ. दीपक परब यांनी वेळोवेळी सर्व संबंधितांचे लक्ष वेधले होते. गेली दोन वर्ष श्री. परब हे या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी न्याय मागत आहे. प्रशासनाने केलेली चूक ही मसुरे ग्रामस्थांच्या माथी मारली गेली आहे. ऐतिहासिक मसुरे हे नाव प्रशासनामुळे आज पुसले गेले आहे. ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना प्रशासनाने ही चूक केली असून आता हे नाव बदलण्यासाठी चालढकलपणा होत आहे. याबाबत पुन्हा एकदा पालकमंत्री चव्हाण यांना मसुरे ग्रामविकास संघ मुंबई आणि मसुरे ग्रामस्थ यांच्यावतीने आंगणेवाडी येथे दीपक परब, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी निवेदन देऊन मसुरे हे नाव ग्रामपंचायत लागावे, यासाठी लक्ष वेधले. मसुरे गावच्या नावाबाबत आणि येथील इतर सर्व विकासात्मक कामाबाबत आपण योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, काका आंगणे, बाळा आंगणे, छोटू आंगणे, सतीश आंगणे, बाबू आंगणे, शांताराम आंगणे, बाब्या आंगणे, नंदू आंगणे, प्रकाश आंगणे, अनंत आंगणे, दीपक आंगणे, रघुनाथ आंगणे, समीर आगणे, जयेश आंगणे, गणेश आंगणे, किर्तिराज आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT